आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय घरवापसी: मानेंबद्दल नाही तक्रार, त्यांची तर आर्थिक मदतच - आनंदराव देवकते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - “मी माझ्या आईच्या घरातच परतलोय. बाळासाहेब शेळके यांच्याशी घट्ट नाते असल्यानेच काँग्रेसपासून दूर जावे लागले होते. दिलीप माने यांच्याविषयी कुठलीच तक्रार नाही. त्यांनी तर आर्थिक मदतच केली. मला सन्मानाने घेतले, तशाच प्रकारे बाळासाहेबांनाही घेऊन या,” असे भावूक उद््गार माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी गुरुवारी काढले. माजी केंद्रीय सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी सायंकाळी काँग्रेस भवनमध्ये पक्ष प्रवेश केला.

देवकते यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव अशोक यांनाही प्रवेश मिळाला. जिल्हाध्यक्षांच्या कक्षात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना श्री. देवकते भावूक झाले होते. ते म्हणाले, “माझ्या रक्तात काँग्रेस आहे. बाळासाहेब पक्षात असताना चांगले काम केले. त्यांचे वडील भीमाशंकर यांच्याशी रक्ताचे नाते आहे. बाळासाहेब आणि मी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत. त्यामुळेच त्यांना सोडून राहणे कठीण झाले होते. पण काँग्रेसपासून दूर राहणे जमले नाही. त्यामुळेच मी माझ्या आईच्या घरी परतलो.”

पेढ्यासाठीझाले वेडे
पक्षप्रवेशानंतर श्री. शिंदे यांना भेटण्यासाठी गर्दी झाली. सोबत फेटे, पेढे आदी होते. गर्दीतून एक ज्येष्ठ कार्यकर्ते घुसले. शिंदे यांना पेढा भरवला. उर्वरित पेढे टेबलवर ठेवण्यात आले. त्या कार्यकर्त्याला राहवले नाही. गर्दीतून टेबलसमोर येऊन त्यांनी तो बॉक्स मिळवला. छायाचित्रकारांनी तो प्रसंग कॅमेरामध्ये बंद केल्याने त्यांनी तातडीने त्यांनाही पेढे देऊन खूष केले.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले,देवकते काँग्रेस पक्ष सोडून गेले, यावर विश्वास बसत नाही .इंदिरागांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसवर पक्षावर अतिशय प्रगाढ निष्ठा असणारे आनंदराव देवकते हे काँग्रेस सोडून गेले होते, यावर कधीच विश्वास बसणार नाही. १९७८ मध्ये ते ‘काँग्रेस आय’मध्ये होते. तर मी त्यावेळी शरद पवार यांच्या सोबत होतो. त्या वेळी देवकते विधानसभेत ढाण्या वाघासारखे एकटे लढत होते. अशी व्यक्ती काँग्रेस सोडूच शकत नाही, असे श्री. शिंदे म्हणाले. काँग्रेस विशाल समुद्र आहे. देवकते त्यात विलीन झाले. सत्तेसाठी सगळे भाजपमध्ये जात असताना देवकते मुलासह काँग्रेसमध्ये येतात ही मोठी गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

माजी केंद्रीय सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत देवकते यांचा पक्षप्रवेश झाला. त्या वेळी संतोष पाटील, प्रकाश यलगुलवार, सिद्धाराम म्हेत्रे आदी उपस्थित होते.

अशोकचे नाव घेऊ नका
आनंदरावदेवकते यांचे चिरंजीव अशोक काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे पक्ष प्रवेशात त्यांचे नाव घेऊ नका, अशी सूचना श्री. देवकते यांनी म्हेत्रे यांना केली. त्यावर म्हेत्रे म्हणाले, “तरी थोडेसे डाग लागलेले आहे. म्हणून...” त्यांच्या उत्तरावर देवकते आेरडले, “कसले डाग लागले? मला ते मान्यच नाही.” या प्रश्नोत्तरांमुळे शिंदे यांच्या हसऱ्या चेहऱ्यावरील रेषा अधिक ठळक िदसल्या.

पाच रुपये भरले काय?
दक्षिणसोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे यांनी श्री. देवकते यांच्या सक्रिय सदस्यत्वाची पावती श्री. शिंदे यांच्याकडे सुपूर्त केली. ती देवकते यांच्या हाती देताना शिंदे म्हणाले, ‘‘पाच रुपये भरले काय?” त्यांना लगेच उत्तर देताना देवकते म्हणाले, “सव्वाशे रुपये भरले.” या संवादाने एकच हशा पिकला.