आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex Mla Subhash Deshmukh Home Encroachment Remove Solapur

माजी खासदार देशमुख यांनी नोटीसनंतर पाडले बेकायदा बांधकाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - होटगी रोडवरील एमआयडीसी पोलिस चौकीसमोरील रस्त्याकडेला नव्याने सुरू असलेले बांधकाम परवान्याप्रमाणे नसल्याची नोटीस माजी खासदार सुभाष देशमुख यांना मिळताच गुरुवारी स्वत:हून ब्रेकरने पाडून टाकले. महापालिकेने 3 सप्टेंबर रोजी नोटीस दिली होती. पालिका आयुक्त चंद्रकांत गुडवार यांच्या कामगिरीचे देशमुख यांनी सर्मथनच केले आहे.

होटगी रोडवर माजी खासदार देशमुख घराचे बांधकाम करत आहेत. 20 जुलै 2012 रोजी मनपाने बांधकाम परवाना दिला. बांधकाम सुरू असताना अनियमितता असल्याने काही बाबी बेकायदेशीर ठरल्या. त्यामुळे ते विनापरवाना व अनधिकृत बांधकाम उतरवण्याची नोटीस मनपाकडून दिली गेली.

दिलेल्या परवानापेक्षा वाढीव बांधकाम केले
परवानगीप्रमाणे बांधकाम न करता, पूर्वेकडील मुख्य रस्त्याच्या फ्रंट मार्जिनमध्ये 10.40 बाय 3.90 मी. आरसीसी कॉलम व बीम घेऊन स्लॅब घातला आहे. पश्चिमेकडील रस्त्याच्या फ्रंट मार्जिनमध्ये 15.70 बाय 0.71 मीटर दोन ठिकाणी बंदिस्त केले आहे. उत्तरेकडील रूम कॉलम तीन मीटर अंतरावर न ठेवता 2.60 मीटर अंतरावर ठेवले आहे. सदरचे बांधकाम अनधिकृत आणि बेकायदेशीर असल्याचे नोटिशीत म्हटले आहे.

गुडेवारांच्या कार्याला सलाम !
बांधकाम करताना चुकून काही भाग अनधिकृत असेल तो पाडण्यास मी सर्मथ आहे. मी चुकीचे केले, त्याबद्दल संबंधितांची दिलगिरी व्यक्त करतो. मोठय़ा लोकांवर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कारवाई केली. त्यांच्या कार्यास सलाम. अशा अधिकार्‍यांची सोलापूरला गरज आहे.’’ - सुभाष देशमुख, माजी खासदार