आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exam News In Marathi, HSC Exam Issue At Solapur, Divya Marathi

मैंदर्गीत सापडले तीन कॉपीबहाद्दर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहर आणि जिल्ह्यातील 84 परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेला सुरुवात झाली. कॉपीमुक्त परीक्षा अभियानसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी हाती घेतलेल्या कडक अभियानाचा परिणाम अनेक परीक्षा केंद्रांत दिसून आला. दरम्यान, मैंदर्गी, (ता. अक्कलकोट) येथील शिवचलेश्वर माध्यमिक विद्यालय येथे परीक्षा केंद्रात तीन कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले.

केंद्रांबाहेर लावलेल्या फलकांवर आपले क्रमांक पाहण्यासाठी गर्दी झाली होती. शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला, संगमेश्वर महाविद्यालय, भारती विद्यापीठ आदी परीक्षा केंद्रांत कडक तपासणी होत होती. जिल्हाधिकार्‍यांनी कॉपीमुक्त परीक्षांसाठी विशेष अभियान राबवले आहे. त्याचा परिणामही अनेक केंद्रांत दिसून आला. कडक तपासणी करूनच विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात सोडले जात होते. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षणाधिकार्‍यांनी आठ भरारी पथक तर 84 बैठे पथक नेमले आहेत. बैठे पथकाने मैंदर्गीच्या शिवचलेश्वर माध्यमिक विद्यालय केंद्रात कॉपी करणार्‍या तीन विद्यार्थ्यांना पकडले.

(फोटोओळ: शहरातील सर्वच केंद्रांवर परीक्षा दालनात सोडण्यापूर्वी कसून तपासणी सुरू होती.)