आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exam News In Marathi, University Exams From 20 March, Divya Marathi

20 मार्चपासून विद्यापीठ परीक्षांना होणार प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मतदानामुळे घोषित केले सुधारित वेळापत्रक
परीक्षेच्या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका आल्या आहेत. सोलापूरसाठी 17 एप्रिल हा दिवस मतदानासाठी घोषित आहे, तो लक्षात घेता सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले आहे, असेही र्शी. लोणीकर म्हणाले. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. ईसीएस सेमीस्टर एक व सहा यांच्या परीक्षांना 20 मार्चपासून प्रारंभ होणार आहे.
सोलापूर विद्यापीठाने ऑक्टोबर - नोव्हेंबर मधील एक, तीन व पाच सत्रापैकी बहुतांश परीक्षांचे निकाल घोषित केले आहेत. अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाचा निकाल सॉफ्टवेअरच्या तांत्रिक कारणाने बाकी आहे, तोही येत्या दहा ते पंधरा दिवसांत घोषित होईल, अशी माहिती प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. एस. व्ही. लोणीकर यांनी दिली.
ऑनलाइन पद्धती असल्याने निकाल घोषित होण्यात विलंब झाला तरी तांत्रिक बाबतीत सुधारणा होऊन पुढील काळात असा विलंब होणार नाही, याची दक्षता विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने घेतली आहे. अभियांत्रिकीतील द्वितीय वर्षाचा निकाल प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण लवकर प्राप्त न झाल्याने रखडला आहे. वस्तुत: प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने महाविद्यालयांकडून वेळेत भरले गेले नाहीत, असे दिसून आल्याने तसेच सॉफ्टवेअरमध्येही काही अडचण उद्भवल्याने विलंब झाला. येत्या 15 तारखेपर्यंत तो लागेल.
निकाल घोषित । अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाचा निकाल तांत्रिक कारणाने बाकी
पुरवणी पेट परीक्षेचा निकाल घोषित
सोलापूर विद्यापीठाने 25 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पुरवणी पेट परीक्षेचा निकाल नऊ दिवसांत घोषित केला. दहा विषयांसाठी 65 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ होते. अंतिम गुणवत्ता यादी 19 मार्चपर्यंत लागेल. त्यानंतर डीआरसीची बैठक आयोजिली जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी दिली. विद्यापीठाच्या पुढील पेट परीक्षेपासून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी आणि संकेतस्थळावर आन्सर की ची सुविधा मिळणार आहे, असेही डॉ. मालदार म्हणाले.