आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा : विद्यापीठाची, प्राध्यापकांची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने 17 एप्रिलपासून बी. ए. तर 20 एप्रिलपासून बी. कॉम. व बी.एस्सी.च्या परीक्षा सुरू करण्याची घोषणा केली. बहुतांशी अनुभवी प्राध्यापकांनी असहकाराचे अस्त्न उपसले असताना या परीक्षा सुरळीत पार पाडण्याची कसरत विद्यापीठाला पार पाडावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या व्यवस्थेवरील असणारा विश्वास न तोडता ही परीक्षा सुरळीत पार पाडताना अनेक कसोटी विद्यापीठाला पार पाडाव्या लागतील. केवळ समन्वयातून अनेक प्रश्न सुटू शकतील. यासाठी सर्व प्राचार्यांचे सहकार्य सर्वांत महत्त्वाचे असणार आहे.


परीक्षेचे वेळापत्रक

बी.ए. - सेमिस्टर एक - 17 एप्रिल, दोन - 21 मे, तीन - 1 जून, चार - 30 एप्रिल, पाच - 20 एप्रिल, सहा - 20 एप्रिल

बी.कॉम. सेमिस्टर - एक व दोन - 20 एप्रिल, तीन व चार - 29 एप्रिल, पाच व सहा - 20 एप्रिल

बी.एस्सी. सेमिस्टर एक व दोन - 20 एप्रिल, तीन - 3 जून, चार - 6 मे, पाच व सहा - 20 एप्रिल
सुरळीत होतील

प्राध्यापकांचा परीक्षा कामकाजावरील बहिष्कार सुरू असला तरीही विद्यापीठाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होतील.’’ डॉ. कृष्णा इंगोले, प्राचार्य, सांगोला महाविद्यालय

केंद्रावर नजर
परीक्षा यंत्रणा सज्ज असून कडक वातावरणात परीक्षा होतील. भरारी पथकाची करडी नजर प्रत्येक परीक्षा केंद्रावर राहील.’’ डॉ. दादासाहेब साळुंखे, परीक्षा नियंत्रक, सोलापूर विद्यापीठ

आंदोलनास यश
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दोन महिन्यांपासून पाठपुरावा केला. सोलापूर विद्यापीठाने आंदोलनाची दखल घेत परीक्षा वेळापत्रक जाहीर केले.’’ युवराज माळगे, महानगरमंत्री, अभाविप