आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एटीएम’मधून पैसे काढताना घेतलेली मदत पडली महाग, तरुणाला ६२ हजार ५०० रुपयांना गंडवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अधिक मासानिमित्त बहिणीला भेटण्यासाठी एक तरुण तुळजापूर तालुक्यातून येथे आला. आई-वडीलही सोबत होते. बहिणीला भेटवस्तू घेण्यासाठी पैसे काढण्यासाठी तो बाळीवेसमधील देना बँकेच्या ‘एटीएम’ केंद्रामध्ये गेला. कार्ड आॅपरेट होत नसल्यामुळे बाहेर थांबलेल्या एका तरुणाची मदत घेतली. तो युवक निघाला चक्क महाठक.

मदत करण्याच्या बहाण्याने कोड नंबर जाणून घेत, कार्डही स्वत:कडे ठेवून घेतले आणि तब्बल ६२ हजार ५०० रुपयांना त्याने गंडविले. ही घटना २३ जून रोजी घडली असून २५ तारखेला रात्री जोडभावी पोलिसात नागनाथ ननवरे (रा. चिंचोळी, आरळी खुर्द, तुळजापूर) यांनी फिर्याद दिली. संशयित चोरांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिस त्या आधारे तपास करीत आहेत.
ननवरे हे पुण्यात बीई पदवी शिक्षण घेतात. अधिक मासानिमित्त ते बहिणीला भेटण्यासाठी आले होते. भेटवस्तूसाठी पैसे काढण्यासाठी वडिलांनी मुलाकडे एटीएम कार्ड दिले. युवकाची मदत घेत त्याने तीन हजार रुपये काढले. पैसे देताना त्या संशयित तरुणाने आपल्याकडील एटीएम कार्ड त्याला दिले. मात्र चालू कार्ड आपल्याकडे ठेवले. त्यानंतर ज्योती टेलिकॉम मोबाइल दुकानातून २५ हजारांचा मोबाइल घेतला. आयसीसीसी बँकेच्या एटीएममधून साडेबारा हजार रुपये काढून घेतले. कालांतराने ननवरे याच्या लक्षात ही बाब आल्यानंतर पोलिसात धाव घेतली. ठकाने ननवरेला दिलेले एटीएमकार्डही बंद असून तो कोल्हापुरातील आहे आणि ब्लॉकही केले आहे.
बातम्या आणखी आहेत...