आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाख कर्मचाऱ्यांची निवृत्ती; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- २०१६मध्ये राष्ट्रीयीकृत बँकांतील लाख कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. बँक रिक्रुटमेंट बोर्ड (बीआरबी)ने भरतीसाठी मोठी मोहीमच हाती घेतली. लिपिकांपासून अधिकाऱ्यांपर्यंतच्या परीक्षा जाहीर केल्या. पदवीधर तरुण, तरुणींनी चांगला अभ्यास करून या परीक्षा दिल्यास नोकरी मिळेल. त्याचा फायदा घेण्याचे आवाहन बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सोमवारी येथे सांगितले.
पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बँक लिपिक परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी बँकेतील अधिकारी नागदेव म्याना, गिरीश चक्रपाणी, सफदर शेख आले होते. बँक परीक्षेची तयारी, अभ्यास कसा करावा आदींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. वाचनालयाचे अध्यक्ष रामुलू मच्छा, सांस्कृतिक विभागप्रमुख नारायण पुजारी मंचावर होते. माणिक सारंगी यांनी सूत्रसंचालन केले. वाणिज्य शाखेतील विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बँकेत नोकरी मिळवण्याचे ध्येय ठेवा, सराव करा, यश तुमचेच
गिरीश चक्रपाणी : बँकेतनोकरी म्हणजे उज्ज्वल भविष्य आहे. आयटी क्षेत्रातील उच्च पदवीधर तरुणही बँकेतल्या नोकरीसाठी येत आहेत. वाणिज्य शाखेकडे कल वाढतो आहे. एकदा ध्येय निश्चित केले की, त्या दिशेने अभ्यास करणे सोपे असते. त्यासाठी ध्येय ठेवा, सराव करा. बँकिंग परीक्षेत निश्चित यशस्वी व्हाल. व्यवस्थापन शास्त्रातील विद्यार्थीही बँकेत उत्तम करिअर करू शकतात. पण दिशा स्पष्ट असली पाहिजे. यश तुमच्याकडे चालून येईल, यात शंका नाही.
इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा
सफदर शेख : बँकिंग नोकरीत केवळ आकडेमोड नाही. तिथे भाषेलाही महत्त्वाचे स्थान आहे. कारण बँकिंग क्षेत्र सेवा देणारे आहे. तिथे अनेक प्रकारचे ग्राहक येत असतात. त्यांच्याशी बोलणे, त्यांच्या गरजा समजावून घेणे यासाठी संवाद कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. बँकेतील पत्रव्यवहार इंग्रजीतून असतो. तो एका बँकेतील सर्व शाखांमध्ये दिसून येतो. त्यातील चुका म्हणजे बँकेच्या प्रतिमेचा प्रश्न असतो. त्यामुळे इंग्रजी व्याकरणासह शिकून घ्या. परीक्षेत
यशस्वी व्हाल.
१५ सेकंदात प्रश्न सोडवा
नाग देवम्याना : शाळा,महाविद्यालयांतील परीक्षेप्रमाणेच बँकिंग भरतीच्या परीक्षा असतात. परंतु त्यासाठी वेळ अपुरा असतो. त्यातच परीक्षार्थीची कसोटी असते. कुठलेही गणित आपण अचूक सोडवतो. पण त्यासाठी वेळ लागतो. बँकिंग परीक्षेत तसे चालणार नाही. मोजून १५ सेकंदात गणित सोडवणे अनिवार्य आहे. त्यासाठी सराव आणि सातत्य महत्त्वाचे आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना आडवी बेरीज येत नाही. आकडे उभ्या पद्धतीने मांडूनच गणिते सोडवतात. ही सवय मोडली पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...