आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालबाह्य औषध तपासणीसाठी समिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका आरोग्य विभागातील औषध भांडारात कालबाह्य औषधे सापडल्याने याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी दिले. त्यानुसार साहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी कार्यवाही सुरू केली. सविस्तर तपास करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकार्‍यांचे पथक नेमण्यात येणार असल्याची माहिती डॉ. जावळे यांनी दिली. आरोग्य समितीच्यी सदस्यांनी सोमवारी केलेल्या पाहणीत हा प्रकार आढळून आला होता. दरम्यान, चौकशी अधिकारी डॉ. जावळे यांनी साठा रजिस्टर ताब्यात घेतले.
महापालिका आरोग्य समितीची सभा मंगळवारी बोलवण्यात आली होती. त्यासाठी आवश्यक असलेले कोरम नसल्याने सभा तहकूब करण्यात आली.
चौकशी करू - चौकशीअंती कारवाईसाठी आयुक्तांकडे शिफारस करण्यात येईल. कालबाह्य औषधे खरेदी करता येतात का? याची चौकशी करण्यात येईल. कोणत्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाई करायची याबाबतचा निर्णय महापालिका सामान्य प्रशासन विभाग घेणार आहे.’’ डॉ. पंकज जावळे, साहाय्यक आयुक्त