आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाच्या घसरणीचा लाभ निर्यातदारांनाच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे अवमूल्यन सुरूच असून, डॉलरच्या तुलनेत रुपया 87 पैशांनी घसरला आहे. त्याचा मोठा लाभ निर्यातदारांना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शनिवारी डॉलरची किंमत 56 रुपये 50 पैसे होती. गेल्या 11 महिन्यात रुपया 4.8 टक्क्यांनी घसरला. सोलापुरातून प्रामुख्याने यंत्रमागावरील उत्पादने निर्यात होतात. यंदा डॉलर अनपेक्षित वाढत असल्याने निर्यातदारांची लगबग सुरू झाली. उत्पादने ठरलेल्या वेळेत पाठवणे, त्यात खंड पडू न देणे, कामगारांकडून जादा काम अशी कामे सुरू झाली.


*250 कोटी: यंत्रमागावरील उत्पादनांची वार्षिक उलाढाल
* आफ्रिकन, आखाती देश आणि युरोपीयन राष्ट्रांत मागणी
* शंभरटक्के कॉटन टॉवेल आणि नॅपकीन्सची असते नोंदणी
* केंद्राकडून मिळते सात टक्के निर्यात अनुदान (ड्रॉ-बॅक)


निर्यातीत प्रचंड घट
यंत्रमागांवरील उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या काही वर्षांपासून प्रचंड घट सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी सुमारे 900 कोटी रुपयांची उलाढाल व्हायची. ती आता अडीचशे कोटींपर्यंत आली आहे. त्याची कारणे म्हणजे कामगारांचा तुटवडा, सुताच्या दरात होणारी वाढ, निर्यात अनुदानात होणारी घट.’’ पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष यंत्रमागधारक संघ


स्थिर झाला पाहिजे
रुपया घसरतो आणि तितक्याच प्रमाणात वधारतोही. एकदा वधारल्यानंतर काही काळापर्यंत स्थिर राहिल्यास त्याचा छोट्या निर्यातदारांना लाभ मिळतो. डॉलरची किंमत 44 रुपये असताना काहींनी उत्पादने निर्यात करण्याचा करार केला. अशांना डॉलर वधारल्याचा लाभ मिळेल.’’ इंदरमल जैन, निर्यातदार