आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदुकीचा धाक दाखवत व्यापाऱ्याला मागितली खंडणी, नऊ जणांवर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - घर बांधकामासाठी पन्नास हजारांची मागणी करत, पैसे दिल्यास पाहून घेईन अशी वारंवार दमदाटी केली. बंदुकीने गोळी घालेन, अशी धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी विकी लक्ष्मण जाधव, साईनाथ जाधव, मंजुनाथ सिद्राम जाधव यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीमध्ये एक नगरसेवकाचा मुलगा असल्याचे सांगितले जाते.

ते १७ नोव्हेंबर कालावधीत हा प्रकार घडला आहे. तिलक उपाध्ये (रा. जुना पुणे नाका) यांनी सलगर वस्ती पोलिसात मंगळवारी फिर्याद दिली आहे. सलगर वस्ती परिसरात त्यांचे तपस्या वॉटर प्लँट आहे. नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमाराला रामवाडी चौकातून उपाध्ये जात होते. त्यावेळी विकी याने दुचाकीवर येऊन त्यांना थांबवले. मी तीन कोटीचे घर बांधतोय. पन्नास हजार रुपये आज आणून दे. तसेच ज्या-ज्या वेळी पैशाची मागणी करेन त्यावेळी पैसे दे म्हणून धमकावले. त्यावेळी त्यांनी भीतीपोटी पाच हजार रुपये दिले.

पुन्हा १६ नोव्हेंबरला जाधव त्याचे साथीदारांनी प्लँटवर येऊन कामगारांना मारहाण केली. आठ दिवसांची मुदत देऊनही पैसे का दिले नाहीस, असा जाब विचारत शिवीगाळ केली. त्याच्याजवळील बंदूक दाखवून गोळी घालेन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये झाले असून त्याचे फुटेज पोलिसांना मिळाले आहे. याबाबत पोलिस निरीक्षक वसंत गायकवाड यांना विचारले असता, फुटेज मिळाले आहे. संशयिताच्या मागावर आहोत. आजही काही जणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.