आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरपूरात बनावट सोने दाखवून जिल्हा बँकेची फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंढरपूर शाखेत बनावट सोने खरे असल्याचे भासवून सुमारे 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे मूल्यनिर्धारक (व्हल्युऐटर) शिरीष कटेकर यांच्यासह या प्रकरणातील अन्य अकराजणां विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कटेकर भारतीय जनता पक्षाचे माजी उपाध्यक्ष असून सराफ असोसिएशनचे माजी पदाधिकारी आहेत. पोलिसांनी कटेकर यांच्यासह एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाची शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेमध्ये शिरीष वल्लभ कटेकर (रा. पंढरपूर) हे 16 ऑक्टोबर 2001 पासून मूल्यनिर्धारक (व्हॅल्युऐटर) म्हणून काम पाहत आहेत. बँकेच्या येथील शाखेत 16 फेब्रुवारी 2012 ते 13 ऑगस्ट 2013 या कालावधी मध्ये व्हॅल्युऐटर म्हणून काम पाहणार्‍या शिरीष कटेकर यांनी भीमा माने (रा. सिद्धेवाडी, ता.पंढरपूर), पंढरीनाथ उत्पात (रा. पंढरपूर), विलास ताड (रा. एकलासपूर, ता.पंढरपूर), खंडेराव पत्की (रा. पंढरपूर), गजेंद्र शिंदे, संभाजी नागटिळक (रा. कौठाळी, ता. पंढरपूर), भीमराव उर्वरित पान 12 बावचे, भारत मोहोळकर, रामचंद्र हाके (कोर्टी, ता.पंढरपूर), बबन बनकर (रा.एकलासपूर) यांच्याशी संगनमत करुन बनावट सोन्याचे दागिने बावन्नकशी सोने म्हणून खरे भासवुन बँकेची सुमारे 44 लाख 5 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी बँकेचे वरिष्ठ निरीक्षक पांडुरंग गांडुळे फिर्याद दाखल केली. पोलिसांनी शिरीष कटेकर व संभाजी नागटिळक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.