आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळ निधीप्रकरणी तहसीलदारांना नोटिसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पुरेसा कालावधी देऊनही 2011-12 या वर्षातील दुष्काळ निधी अद्याप शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा न करणार्‍या तहसीलदारांना नोटिसा देण्यात आल्या. दोन दिवसांत तहसील कार्यालयास लाभार्थी शेतकर्‍यांची यादी सादर न करणार्‍या तलाठय़ांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश महसूल प्रशासनाने काढले आहेत. मे अखेरपर्यंत दुष्काळ निधीचे वाटप करण्याचे आदेश असताना अनेक तालुक्यांतील वाटप 50 टक्क्यांवरच रखडले आहे.
2011-12 या कालावधीत अपुरा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हेक्टरी 4 हजार 500 रुपयांचा मदतनिधी जाहीर केला होता.
त्यापोटी जिल्ह्यास 267 कोटी रुपये मिळाले. गारपीटग्रस्तांना निधीचे वाटप व लोकसभा निवडणुकांमुळे या निधीचे वाटप लांबणीवर पडले. निवडणुकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी या निधीचे वाटप करण्याचे तहसीलदारांना दिले. मात्र, तलाठय़ांनी तहसील कार्यालयास अद्याप शेतकर्‍यांची यादीच न दिल्याने मदत वाटप करता आले नाही. तहसीलदारांना जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी, तर तलाठय़ांना प्रांताधिकार्‍यांनी नोटिसा काढल्या आहेत. सोमवारपर्यंत तहसील कार्यालयास याद्या सादर न केल्यास संबंधित तहसीलदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशच प्रांताधिकारी यांनी दिले आहेत.
रक्कम वाटपात विलंब केल्याने नोटिसा
जिल्ह्यात 2011-12 या रब्बी हंगामातील पिके वाया गेल्याने शासनाकडून 267 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. याचे वाटप करण्याचे आदेश असतानाही अनेक तहसीलदारांनी रक्कम वाटपात विलंब केला. यामुळे तहसीलदारांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत.’’ विजयकुमार देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी