आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खचू नका!, मी दोनदा नापास झालो, पण बिघडलं कुठं? नागराज मंजुळेंची FB पोस्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. निकालाची टक्केवारी वाढल्याची चर्चा असतानाच बार्शीत एका नापासाने आत्महत्या केल्याची बातमी धडकली. सांगलीत निकालाच्या धास्तीने एका मुलीने आत्महत्या केली. निकालानंतर ती पास झाल्याचे कळले. पुढील काही दिवसांमध्ये दहावीसह अनेक परीक्षांचे निकाल लागतील. या परीक्षेत चांगले गुण मिळवणे, पास होणे गरजेचे असते. मात्र, नापास झाले म्हणtन बिघडत नाही. मित्रांनो, आयुष्य खूप अनमोल आहे. इतका टोकाचा निर्णय घेऊन नका. अशा परीक्षांमध्ये नापास झालेली अनेक माणसे आज यशाच्या शिखरावर अाहेत.

‘पिस्तुल्या’ (लघुपट) आणि ‘फँड्री’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी गुरुवारी फेसबुकवर, ‘मी दहावीत दोनदा नापास झालो, पण बिघडलं कुठं?’ अशा आशयाची पोस्ट केली. सोबत दहावी नापास गुणपत्रिकेचा फोटोही अपलोड केला. या पोस्टला चार तासांत २८०० हून अधिक लाइक्स २६० हून अधिक समर्थन करणाऱ्या कॉमेंट्स आल्या. ३७५ जणांनी ही पोस्टही शेअर केली. हा सिलसिला शुक्रवारीही सुरूच हाेता.

काय म्हणतात मंजुळे...
मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो. मात्र, नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही. दहावी, बारावी, एमपीएससी, यूपीएसएसी... परीक्षा कुठलीही असो, ती कधीच अंतिम नसते. यशापयशात.. असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही.

शाळेत गणित कच्चे, व्यवहारातले मात्र उत्तमच
नागराज मंजुळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, ‘अाजकालच्या आई-वडिलांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खूप महत्त्व िदले आहे. जगणं खूप प्रदीर्घ आहे. नापास झालो म्हणजे सर्वकाही संपले असे नाही. शाळेच्या बाहेरच जगणं हे खरं जगणं असत. डिग्री घेऊनच काम करता येतं अस नाही. मी दहावीत दोनदा नापास झालो. त्यानंतर बारावी, पदवीला काहीच अडचण आली नाही. मी आता दोनदा एमएमध्ये फर्स्ट क्लास आलो. माझे शाळेतले गणित कच्चे असले तरी व्यवहारातील चांगले आहे. खरं आत्महत्या करण्यासाठी जगात आता तुमच्यासाठी कुठलीच कारणं शिल्लक नाहीत.’
बातम्या आणखी आहेत...