आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- यंदाचा व्हॅलेंटाइन डे तरुणाईसाठी खास आहे. कारण याच दिवशी (14 फेब्रुवारी) प्रेमाचा संदेश देणारा फँड्री चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेमी युगुलांसाठी ही खास भेट ठरणार आहे. प्रेमाचा संदेश तसेच समाजातील प्रखर वास्तव दाखवणारा चित्रपट तरुणाईसह सर्वांना आवडेल, असा विश्वास फँड्रीचे दिग्दर्र्शक नागराज मंजुळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.
आपण कितीही पुरोगामी म्हणालो तरी जाती व्यवस्थेच्या चौकटी आजही मजबूत आहेत. या चौकटीत प्रेमाच्या कोमल भावनांचा कायमच बळी जातो. पण, काहीजण वेगळे असतात. ते आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतात. प्रेमाचा निरागस भाव जपतात. आपले प्रेम सत्यात आणण्यासाठी संघर्ष करतात. काही जण जिंकतात, तर काही जण गुडघे टेकतात. प्रेम आणि वास्तव याचे फँड्री हा चित्रपट प्रतिनिधीत्व करतो. प्रेमाच्या कोमल भावना, त्याला होणारा विरोध या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, 'अशी आहे कथा...'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.