आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Death News In Marathi, Electricity Shock, Divya Marathi, Solapur

डीपी दुरूस्तीसाठी गेलेला तरूण शेतकरी विजेच्या धक्केने ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शेतातील डीपीमध्ये बिघाड झाल्यामुळे दुरुस्ती करताना विजेचा शॉकने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी दुपारी सव्वातीनच्या सुमाराला मार्डीत घडला. सतीश पांडुरंग कदम (वय 29, रा. मार्डी, उत्तर सोलापूर) असे मृताचे नाव आहे.


वायरमनकडे डीपी बंद पडल्याची तक्रार दिल्यानंतर वायरमन माळी, साळुंखे शेतात आले. त्यांनीच कदम यांना डीपी दुरुस्तीसाठी सूचना दिली होती. वीज प्रवाह बंद केला आहे. डीपीवर चढून दुरुस्ती करण्यास सांगितले. पण वीजप्रवाह चालू असल्यामुळे त्यांना शॉक बसला व छाती, पाय भाजले. शासकीय रुग्णालयात भाऊ लिंबराज कदम यांनी दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच सतीशचा मृत्यू झाला. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची नोंद आहे. सतीशच्या मागे आई छाया, पत्नी रूपाली, एक वर्षाचा मुलगा भैरव, पाच वर्षांची मुलगी राधा असा परिवार आहे.