आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतक-यांना मोफत बियाणे; कृषिमंत्री शरद पवार यांची घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दुष्काळामुळे राज्यातील शेतक-यांना दुबार पेरणी करण्याची वेळ येणार आहे. त्यासाठी केंद्राच्या वतीने राज्य शासनाकडे मोफत बियाणे उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी सोलापुरातील दुष्काळ आढावा बैठकीत केली. तसेच दुष्काळावरील उपाययोजनांसाठी सोलापूर जिल्ह्यातील आमदारांनी निधीतून प्रत्येकी एक कोटी तर खासदारांनी अडीच कोटी निधी द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
टेंभुर्णी (ता. माढा) येथे पवार यांनी बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे, आमदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार सुधाकर परिचारक, आमदार दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी आदी उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर प्रथम पिण्यासाठी करून त्यानंतर पिकांसाठी करायला हवा. दुष्काळी भागातील फळबागा वाचवणे गरजेचे आहे. त्यासाठी टँकरने पाणी देण्याची उपाययोजना करून त्या जगवल्या पाहिजेत. त्यासाठी केंद्राची आवश्यक असणारी मदत देऊ, नरेगामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये सिंचन, विहिरी पुनर्भरण व सिमेंट बंधारे आदी योजनांचा यात समावेश करण्यात आला आहे. परंतु ही कामे 60 आणि 40 टक्के या निकषानुसार करावी लागतात. त्यामुळे सिमेंट बंधा-याच्या कामासाठी निधी कमी पडतो. त्यामुळे आमदारांनी प्रत्येकी एक कोटी आणि खासदारांनी अडीच कोटींचा निधी द्यावा आणि उर्वरित निधी जिल्हा परिषदेने उपलब्ध केला पाहिजे. राज्याच्या रोहयोचे बजेट 30 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. 1000 कोटीचे बजेट 1300 कोटींवर नेले आहे. त्यात प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची, सिंचनाची कामे हाती घेतली जातील,’ असेही त्यांनी सांगितले.
‘पशुधनासाठी चा-याबरोबरच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने 50-50 टक्के याप्रमाणे प्रत्येकी एक किलो पशुखाद्य देण्याची केंद्राची तयारी आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दहा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू असून, आणखी पाच योजना सुरू करण्याला प्राधान्य देण्यात येईल. 1140 पाझर तलावांपैकी 731 पाझर तलाव पूर्ण झाले आहेत. विहीर पुनर्भरणाच्या कामावर अधिक भर देण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी दुष्काळाचा मोठा सामना लोकांना करावा लागत आहे.
विम्याचे 55 कोटी लवकरच - सोलापूर जिल्ह्यातील 2011-2012 या आर्थिक वर्षात शेतक-यांनी विम्याचे हप्ते कंपनीकडे भरले आहेत. पण अद्याप ते शेतक-यांना मिळालेले नाहीत. सुमारे 55 कोटी रुपये इतकी त्याची रक्कम आहे. या पैशांबाबत विमा कंपनीला सूचना केली आहे. लवकरच हे पैसे शेतक-यांना मिळतील, असेही पवार यांनी सांगितले.