आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृग कोरडाच गेला, आणखी पंधरा दिवस नाही पावसाची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उन्हाळ्याची सुुटी संपल्यानंतर दरवर्षी जून महिन्यात शाळा आणि पाऊस एकदाच सुरू होतात. शाळा सुरू झाल्या असल्या तरी अद्याप पावसाने मात्र दांडी मारली आहे. यामुळे शेतकरीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान खात्याकडील ताज्या माहितीनुसार जुलैच्या 10 तारखेपर्यंत पाऊस दृष्टिक्षेपात दिसत नाही. 10 जुलैपर्यंत पाऊस न आल्यास खरिपाच्या पेरण्या लाबंणीवर पडतील. त्यामुळे पेरणी क्षेत्रावर परिणाम होणार आहे. भाजीपाल्यांची आवक कमी होऊन दर आणखी वाढतील अशी शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्यात 110 मिलिमीटर पाऊस पडणे आवश्यक आहे. मात्र 25 जूनपर्यंत फक्त 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी जून महिन्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये 115 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदाच्या वर्षी मात्र 7 ते 21 जून या कालावधीत मृग नक्षत्रात एकही पाऊस समाधनकारक न झाल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या आठवडाभरात किमान पेरणीसाठी उपयुक्त असा पाऊस न झाल्यास पेरण्या होणार नसल्याची शक्यता आहे.
अवर्षण प्रवण क्षेत्रात 10 जुलैपर्यंत नाही पाऊस
700 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस पडणारी ठिकाणे अवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. यानुसार महाराष्टÑ राज्यातील 114 तालुके अवर्षणप्रवण क्षेत्राखाली येतात. यामध्ये सोलापूर, अहमदनगर, धुळे व नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग, सांगली व सातारा जिल्ह्याचा पूर्वभाग यांचा समावेश आहे. या ठिकाणी 10 जुलैपर्यंत तुरळकही पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येते.

पाऊस न पडण्याचे काय आहे कारण
1 मागील महिन्यात म्हणजेच मे च्या उत्तरार्धात व जूनच्या पहिल्या आठवड्यात अरबी समुद्रात नैनक वादळ निर्माण झाले होते. या वादळामध्ये (वारा) अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले बाष्प देशाच्या पश्चिम भागाकडे न येता ते देशाच्या पूर्व भागाकडे गेले आणि हा पाऊस त्या भागाकडे पडला. शिवाय देशाच्या पश्चिम भागात बाष्प नसलेले फक्त कोरडे वारे वाहत राहिल्याने पाऊस आला नाही.
2 हे वर्ष अलनिनो वर्ष म्हणून ओळखले जाते. मार्च व एप्रिल महिन्यात पॅसिफिक महासागरात तापमान वाढल्यास पाऊस कमी पडतो आणि तापमान कमी असल्यास पाऊस अधिक पडतो. यंदाच्या वर्षी पॅसिफिक महासागरावर तापमान वाढल्याने हे वर्ष अलनिनो मानण्यात आले. याआधारेच पाऊस कमी असल्याचे यंदा हवामान खात्याने जाहीर केले.
आले नाही बाष्प
४नैनक वादळामध्ये अरबी समुद्रातील पाऊस पडण्यासाठी आवश्यक इतके बाष्प न आल्याने पाऊस लांबला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 10 जुलैपर्यंत मोठा पाऊस दिसत नाही. आतापर्यंत अंदाज केलेल्यापेक्षा 87 मि.मी.कमी पाऊस झाला आहे.
जे. डी. जाधव, कृषी हवामान शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, सोलापूर