आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmers News In Marathi, Aid Package, Hailstorm, Divya Marathi

जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना 171 कोटींचा दुसरा हप्ता जिल्हाधिका-यांकडे वर्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांसाठी दुसरा हप्ता म्हणून 171 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारने जिल्हाधिकार्‍यांकडे मंगळवारी वर्ग केली आहे. ही रक्कम येत्या दोन दिवसांत तहसीलदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात होईल. जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांच्या मदतीचा एकूण आकडा 234 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. प्रशासन मदत वितरणासाठी गांभीर्याने कामाला लागले आहे.


शेतकर्‍यांना मतदानापूर्वीच रक्कम वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम जमा व्हावी, यासाठी प्रयत्न होत आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला 63 कोटी 36 लाख रुपयांची रक्कम आली होती, यापैकी 52 कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले.


तिसरा टप्पा किती कोटी?
दोन टप्प्यात जिल्ह्यासाठी 234 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा 368 कोटी रुपयांवर गेला आहे. त्यामुळे शासनाकडून जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी 134 कोटी रुपये येणे अपेक्षित आहे.