आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmers Should Be Loans On Timely, Collector Tukaram Munde

शेतकऱ्यांना वेळेत कर्ज न दिल्यास कारवाई करू, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंचा बँकांना इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शेतकऱ्यांना कर्जा करता हेलपाटे घालावे लागू नये याची दक्षता बँकांनी घ्यावी. जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज द्यावे. कर्ज देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला.
शेतीतून अधिक उत्पन्न यावे याकरता पाऊस, बियाणे, खते वेळेवर पुरेसा पतपुरवठा असे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. शिवछत्रपती रंगभवन येथे आयोजित बँक शाखा व्यवस्थापकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याचा दुप्पट पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला अाहे. हजार कोटी रुपये पीक कर्जाकरता तर हजार कोटी रुपये ठिबक सिंचन, शेडनेट, प्रक्रिया केंद्रे तसेच शेतीवर आधारित उद्योग इत्यादीकरता राखून ठेवले आहेत. मोठ्या प्रमाणावर पतपुरवठा आराखडा तयार करून कर्ज वाटपात आवश्यक ती प्रगती नाही असे दिसत आहे, असे जिल्हाधिकारी मुंढे यांनी खंत व्यक्त केली.
प्रास्ताविक अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीनिवास पत्की यांनी केले. यावेळी जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड, तसेच जिल्हा कृषी अधीक्षक रफिक नाईकवाडी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेकरता जिल्ह्यतील सर्व बँकांचे शाखा व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
... तर थेट कारवाई
शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करताना संबंधित बँक अधिकाऱ्यांनी कर्ज प्रकरणाकरता अनावश्यक कागदपत्रांची मागणी, वेळकाढूपणा, स्वत:च्या अधिकारात नवीन अटी लादणे त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेलपाटे घालण्यास लावू नयेत. असे करताना कोणी आढळले तर त्यावर थेट कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
यांच्याशी साधा संपर्क
शेतकऱ्यांच्या कर्जासाठी हजार कोटींची तरतूद केली आहे. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले पाहिजे. कर्ज मिळण्यात संबंधित शेतकऱ्याला काही अडचण असेल तर तालुका तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी संपर्क असावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले.