आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात बचत गटांचे उपवासाचे पदार्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- काही महिला बचत गटांनी तयार केलेल्या उपवासाच्या पदार्थांना मागणी आहे. नवरात्रोत्सवानिमित्त बाजारात उपवासाच्या पदार्थांची रेलचेल आहे. बचत गट व्यावसायिकतेची जोड देत खवय्यांना विविध प्रकारचे पदार्थ देत आहेत.

भगरीचे धिरडे, भगरीची खीर, पॅटीस, वेफर्स, शेंगा लाडू, चिवडा, साबुदाण्याचा पिठी लाडू, रताळ्याचा खिस, बटाट्याचा शिरा आणि उत्तप्पा, साबुवडे, भाकरी, पापड. बाजारातील घरगुती ग्राहक आणि कार्यालये व मोठय़ा प्रकारची दुकाने यात मागणी आहे.

चव सोलापूरकरांना आवडते
आमच्या बचत गटाने तयार केलेल्या वेफर्सची चव जवळपास 70 टक्के सोलापूरकरांना माहीत झाली आहे. याच्या विक्रमी विक्रीमुळे आम्ही सर्मथ झालो. स्वावलंबी बनलो.
-वासंती साळुंके, लक्ष्मी-नारायण बचत गट, जनकल्याण मल्टी सोसायटी

आत्मविश्वास वाढला
पदार्थांना मागणी वाढल्याने महिलांचा आत्मविश्वास वाढला. या कामाने प्रत्येकाला उभारी मिळाली. आर्थिक समृद्धी आली.
-ज्योती ढोनसळे, वैभवलक्ष्मी बचत गट

असे आहेत बचत गट
स्वयंसिद्धा बचत गटाअंतर्गत वैभव लक्ष्मी बचत गट गेल्या वर्षापासून काम करत आहे. सदस्या ज्योती ढोनसळे काम पाहात आहेत. याकामी त्यांना अन्य सदस्यांची मदत आहे.

सुशीला माता बचत गटाच्या माध्यमातून साधना पवार साबुवडा तयार देत आहेत. स्वयंसिद्धा बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी रूचकर वड्या आणल्या आहेत.

लक्ष्मी-नारायण बचत गट- वासंती साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली गेले चार वष्रे मोठय़ा बटाट्याचे वेफर्स तयार करण्याचे काम करते. त्यांच्या या पदार्थाला शहराबाहेरही मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे.

वैभवलक्ष्मी बचत गटाने महादेवी शिर्के व नीता नाशिककर यांच्या नेतृत्वाखाली वर्षापासून साबुदाणा पीठ व भगरीचे पीठ पुरवण्याचे काम करत आहे.