आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-बाबा शोधत होते आणि ती पाण्याच्या टाकीत बुडालेली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-आईघरातील हॉलमध्ये बसली होती. पंधरा मिनिटांपूर्वी खेळत असलेली दोन वर्षांची मुलगी दिसत नसल्याने त्यांनी शोध सुरू केली. शेजा-यांकडे चौकशी केली. दरम्यान, मुलीचे वडील कामावरून जेवायला घरी आले. त्यांनीही सायकलवर फिरून परिसरात शोधाशोध केली. कुठेच सापडली नाही. काही वेळाने आई किचनमध्ये आल्यानंतर मुलगी आढळली. ती पाण्याच्या टाकीत दिसली. डोके पाण्याखाली होते आणि पाय वर. तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तो पर्यंत खूपच उशीर झालेला होता.हा दु:खद प्रसंग आलाय संजीव कृष्णदेवी गाजूल (रा. लतादेवीनगर, स्वागतनगरजळ) या दाम्प्यांवर. वैष्णवी संजीव गाजूल (वय 2) असे मृत मुलीचे नाव आहे. संजीव हे यंत्रमाग कारखान्यात काम करतात. आई कृष्णदेवी गृहिणी आहे. त्यांना स्नेहा नावाची चार वर्षाची पहिली मुलगी आहे. वैष्णवी ही दुसरी. त्या म्हणाल्या, ‘माझ्यासोबतच खेळत होती. काही वेळाने ती स्वयंपाक घरात गेल्याचे कळलेच नाही. नंतरही ती पाण्याने भरलेल्या टाकीत उलटी पडल्याचे दिसले. पण आमची लेक गेली ..हो....खूप हुशार आणि सुंदर मुलगी होती.’ हे सांगताना दोघा आई-बाबांना हुंदके आवरत नव्हते.