आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन लेकींवर पित्याचेच दुष्कर्म

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पोटच्या तीन लेकींवर पित्यानेच दुष्कर्म केल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर)जवळ उघडकीस आली आहे. चौदा वर्षाच्या पीडित मुलीने पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर 18 एप्रिलपर्यंत त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

संशयित आरोपी मूळचा कर्नाटकातील आहे. मागील चार महिन्यांपासून तो पत्नी, तीन मुलींसह येथे राहात आहे. आईस्क्रीम विकणे, मार्केट यार्डात हमाली अशी कामे तो करत होता. चार एप्रिल रोजी त्याच्या तीन मुली घरात झोपल्या होत्या (वय 13, 14 व 18, एकीचा विवाहही झाला आहे.) दारूच्या नशेत बापाने त्यांना मोबाइलवर काही बीभत्स दृश्ये दाखवली. झोपेच्या गोळ्या देऊन त्यांच्याशी दुष्कर्म केले. एका मुलीने झोपेच्या गोळ्या घेण्यास नकार दिल्यानंतर तिला मारहाण केली. काही वेळाने ती मुलगी घराबाहेर पडली. त्याच दरम्यान, वळसंग पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक खोकले व त्यांचे पथक कुंभारी शिवारात चार एप्रिल रोजी मध्यरात्री गस्त देत होते. मुलगी रस्त्याने फिरताना त्यांना दिसली. तिला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर कुंभारी परिसरात राहायला असल्याचे सांगितले. घरी सोडतो चल म्हणून पोलिसांनी विनवणी केली. मला घरी जायचे नसल्याचे सांगितले. त्यानंतर तिला बालसुधारगृहात आणून ठेवण्यात आले.

दुसर्‍या दिवशी बाल कल्याण समितीच्या त्रिस्तरीय सदस्यांनी मुलीची चौकशी करून घटनेची माहिती जाणून घेतली. त्यावेळी मुलीने आपल्या पित्याचे दुष्कर्म कथन केले. त्यानंतर पोलिसांना या समितीने लेखी स्वरूपात घटनेची माहिती कळविली. त्यानंतर मुलीची काल शुक्रवारी रात्री फिर्याद घेण्यात आली. शनिवारी वडिलांना व आईला मुलींचे संरक्षण करण्यास असर्मथता दाखविल्यामुळे अटक झाली. दोघांना अठरा एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. मुलीच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.