आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार असोसिएशनचा शतकोत्तर महोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-सोलापूर बार असोसिएशनचा शतकोत्तर महोत्सव कार्यक्रम शनिवारी आयोजिला आहे. या वेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे, के. के. तातेड, आर.डी.धनुका यांच्यासह पालकमंत्री दिलीप सोपल, आमदार विजयकुमार देशमुख, दिलीप माने, प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
आसरा चौकातील बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलात शनिवारी (ता. 1 फेब्रुवारी) रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत न्यायमूर्ती शिंदे, तातेड, धनुका यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होईल. सायंकाळी सहाच्या सुमाराला केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बार असोसिएशनच्या वेबसाइटचे उद्घाटन, ज्येष्ठ वकील, न्यायाधीश यांचा सत्कार सोहळा असल्याची माहिती बार असोसिएशनचे सचिव महेश जगताप यांनी बुधवारी दिली. रात्री आठ ते दहा यावेळेत संगीत रजनी कार्यक्रम आहे. कार्यक्रम नियोजनासाठी कमिटी नेमण्यात आली असून यात बारचे अध्यक्ष शिवशंकर घोडके, सचिव जगताप, उपाध्यक्ष संतोष न्हावकर, सहसचिव स्वाती बिराजदार, खजिनदार अमित आळंगे यांच्यासह ज्येष्ठ वकील रजाक शेख, व्ही. डी. फताटे, व्ही. एस. आळंगे, संजीव सदाफुले, मंगला चिंचोळकर, हेमा शिंदे यांच्यासह आदी वकिलांचा समावेश आहे.