सोलापूर-शहराचे वैभव असलेल्याविजापूर रस्त्यावरील धर्मवीर संभाजी तलावात सकाळी नागरिक शुध्द हवा घेण्यासाठी येत असतात. मात्र, त्यांना अशुध्द हवा घ्यावी लागते. शनविारी सकाळी महापौर सुशीला आबुटे या मार्गावरून येत असताना तलावातील पदपथावरील घाण पाहून खाली उतरल्या. त्यांना घाणीचा वास सहन झाला नाही. नाक पकडून त्यांना पाहणी करावी लागली. यामुळे त्या चांगल्याच संतापल्या. मनपा उद्यान विभागाचे अधिकाऱ्यांना चांगल्याच फैलावर घेतले.
तलावात सांडपाणीमिश्रीत होत असून ते बंद करण्यासाठी तेथे बायपास ड्रेनज लाइन टाकण्याचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे. घाण पाण्यामुळे तलावांतील मासे मरण पावले, जलपर्णी वाढली. असे असताना महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे.