आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित महिला हिंसाविरोधी संघटित लढा द्या - तमशेट्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दलित महिलांनी हिंसेच्या विरोधात निर्भयपणे उभे राहून, संघटितरीत्या आवाज उठवल्याशिवाय दलित महिलांवरील अन्याय थांबणार नाहीत, असे प्रतिपादन अँड. सरोजिनी तमशेट्टी यांनी दलित महिला हिंसाविरोधी परिषदेत केले.
मानवी हक्क दिनानिमित्त मंगळवारी मैत्री नेटवर्क (मुंबई), साधना संस्था (पुणे), अंधरूढी निर्मूलन समिती व डॉ. आंबेडकर सोशल सायन्स अँण्ड रिसर्च सेंटर यांच्या वतीने विजापूर नाका येथील समाज मंदिरात दलित महिला हिंसाविरोधी परिषद घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मीनाक्षी गायकवाड होत्या. या वेळी मंचावर सुजाता फडतरे, नगरसेवक मधुकर आठवले, यशवंत फडतरे उपस्थित होते.
भारताला स्वातंत्र्य मिळून 66 वर्षे झाली तरीही दलितांवरील अन्याय थांबले नाहीत. कायद्याची कठोर अंमलबजावणी केल्याशिवाय हे अन्यायाचे सत्र थांबणार नसल्याचे सुजाता फडतरे यांनी सांगितले.
सुभाष वाघमारे यांनी सूत्रसंचालन तर इंद्रजित कांबळे यांनी आभार मानले. या वेळी प्रकाश रेऊरे, चंद्रकांत बनसोडे, केवल फडतरे आदी उपस्थित होते.