आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fighting Of Survival,Latest News In Divya Marathi

स्वत:चा बाळ गेला, शासनाचा ‘श्रावणबाळ’ झुलवत ठेवला.!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कर्ज झाल्याने स्वत:च्या मुलाने गळफास घेतला. जाताना पत्नी, चार मुलांना सोडून गेला. पत्नी कर्करोगाने गेल्या. माथी वैधव्य आलेल्या सुनेला घेऊन जगण्याची लढाई सिद्राम नंदाल यांनी सुरू केली. पण पक्षाघाताने त्यांचेही हात-पाय गळाले. तरीही काठी, चादरीची पिशवी, त्यात कागदपत्रे घेऊन उत्तर तहसीलच्या संजय गांधी योजना कार्यालयात गेल्या 3 तीन वर्षांपासून त्यांचे हेलपाटे सुरू आहेत. प्रत्येक वेळी कागदपत्रांतील त्रुटी काढल्या जातात. दिलेले कागद गहाळ होतात. त्यामुळे हताश झालेल्या नंदाल यांना शासनाच्या र्शावणबाळानेही झुलवत ठेवले आहे.
हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकुलमध्ये राहणारे नंदाल कामगार होते. आयुष्याच्या उत्तरार्धासाठी थोडी पुंजी सांभाळून ठेवली होती. परंतु, पत्नीला कर्करोगाने घेरले. त्यात सारे काही संपले. एकुलता एक असलेला मुलगाही कर्जबाजारी झाला. त्याला कंटाळून एके दिवशी गळफास घेऊन त्याने जीवनयात्रा संपवली. त्याच्या निशाणी असलेल्या मुलांना शिकवायचे, मोठे करायचे असे सिद्राम नंदाल यांनी ठरवले. परंतु नियतीने त्यांच्यावरही घाला घातला. पक्षाघाताच्या झटक्याने त्यांचे हात-पाय लुळे पडले. सून शोभा विड्या वळण्याचे काम करतात. त्यांना हातभार लावण्यासाठी र्शावणबाळ योजनेतून अनुदान मिळेल या अपेक्षेने र्शी. नंदाल यांनी 18 ऑगस्ट 2011 रोजी अर्ज केला. तेव्हापासून ते सातत्याने हेलपाटे घालत आहेत.