आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • File Murder Crime, Death Body Before Police Station

खुनाचा गुन्हा दाखल करा; मृतदेह पोलिस ठाण्यासमोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ) येथे मातंग समाजातील एका कुटुंबीयाला मारहाण करण्यात आली होती. यातील जखमी झालेल्या वृद्धाचा मंगळवारी (दि.७) दुपारी वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाइकांनी "संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करा' असे म्हणत मृतदेह थेट पोलिस ठाण्यासमाेर ठेवला.

हंगरगा (नळ) येथे २५ मार्च रोजी गावातील देडे कुटुंबीयाला किरकोळ कारणवरून मारहाण करून घर जाळल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी सलीम पटेल, अब्दुल पटेल, कमाल पटेल, जमाल पटेल, सत्तार पटेल, पाशू पटेल, गालीब पटेल, शुकूर पटेल, मुनाफ पटेल, पाशा पटेल, अबुल पटेल, सय्यद खानपिरे संतोष वाघोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जयश्री देडे यांच्या तक्रारीनुसार वरील लोकांनी संगनमत करून मारहाण करत घरातील १५ हजारांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. तसेच घर पेटवून दिले, यावरून यातील आरोपींना अटक करण्यात आली होती. तर चौघे फरार आहेत. दरम्यान, मंगळवारी (दि.७) दुपारी वाजेच्या सुमारास निवृत्ती देडे यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू या मारहाणीमुळेच झाला, असा आरोप करत नातेवाइकांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत मृतदेह पोलिस ठाण्यासमोर ठेवून ठिय्या मांडला. अधिका-यांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी माघार घेतली.