आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fill Up 22 Crores For Road, Otherwise No Subsidy

रस्त्यासाठी २२ कोटींचा हिस्सा भरा, अन्यथा अनुदान नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजने अंतर्गत शहरात २१२ कोटींचे रस्ते आणि २३१ कोटींचे ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या ७० टक्के आणि मनपाच्या ३० टक्के अनुदानातून हे काम होत आहे. रस्ते कामासाठी २२.२२ कोटी रुपयांचा हिस्सा मनपा भरणार आहे.दरम्यान, मनपाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम त्वरित भरावी, असे पत्र शासनाने पाठवले आहे. पैसे भरल्यास शासन अनुदान देणार नाही, असा इशाराही दिला आहे.

शहरातील रस्ते आणि ड्रेनेज योजनेची सुरुवात २०१३ मध्ये झाली. आतापर्यंत ४० टक्के काम झाले आहे. डिसेंबर २०१५ पर्यंत या दोन्ही योजनेची कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु अनुदान नसल्याने शहरातील रस्ते आणि ड्रेनेज कामे मंदगतीने सुरू आहेत. रस्त्यासाठी ६६.२२ कोटी हिस्सा मनपा भरणार आहे. त्यापैकी ड्रेनेजचा ३४ कोटी हिस्सा मनपाने यापूर्वीच भरला आहे. रस्त्याचा हिस्सा भरावा, असे पत्र शासनाने मनपाला पाठवले आहे. अनुदान भरण्यास विलंब झाल्यास नागरिकांना रस्ते आणि ड्रेनेज सुविधा मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

ड्रेनेजसाठी ९६ कोटी
ड्रेनेजयोजनेअंतर्गत १०१ किमीची ड्रेनेज लाइन आणि तीन मलनिस्सारण केंद्र अशी २२८ कोटींची योजना आहे. मूळ मंजूर रक्कम १८७ कोटींची आहे. शासन ७० टक्के आणि मनपा ३० टक्के हिस्सा देणार आहे. या योजनेसाठी वाढीव मक्त्यासाठी मनपाला ९६ कोटी भरावे लागणार आहेत. आतापर्यंत मनपाने २१ कोटी खर्च केले आहेत. अन्य रकमेसाठी शासनाच्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे. या योजनेचा हिस्सा भरण्यासाठी रक्कम नसल्याने ड्रेनेजच्या कामाचा वेग मंदावला.

यंदा यूजर चार्जेस नाहीत
सन२०१५-१६ चे मिळकतकर बिल काढण्यात येत असून त्यात यूजर नाही तर यूजर चार्ज नाही अशी भूमिका मनपा प्रशासनाकडून घेतली आहे. त्यामुळे हद्दवाढ भागातील नागरिकांचे ६०० रुपये या वर्षी वाचणार आहेत.

मुख्य लेखापाल कार्यालयास कळवू
नगरोत्थानचे अनुदान भरण्यासाठी शासनाकडून पत्र आले आहे. बँक खाते उघडण्यासाठी मुख्य लेखापाल कार्यालयास कळविण्यात येईल. शांतारामअवताडे, उपअभियंता, मनपा रस्ते विभाग

शासनाचे आले पत्र
नगरोत्थानयोजनेअंतर्गत २१२ कोटी खर्चून हद्दवाढ भागाससह शहरातील ९० किमीचे रस्ते होणार आहेत. त्यापैकी ११ रस्त्यांची कामे सुरू आहे. या योजनेसाठी शासनाने आतापर्यंत ४६ कोटी दिले आहेत. मूळ १८७ काेटी रकमेपैकी ३० टक्के रक्कम मनपाने भरणे आहे. यापैकी ३४ कोटी रक्कम मनपाने यापूर्वीच भरली आहे. अन्य २२.२२ कोटी रक्कम तत्काळ भरा अन्यथा शासन पुढील अनुदान देणार नाही असे शासनाकडून आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हे काम निधीअभावी थांबवू शकते.

यूजर वसुली ३२ कोटींची, खर्च मात्र २१ कोटी
ड्रेनेजसुविधा देतो म्हणून मागील तीन वर्षापासून नागरिकांकडून ६०० तर व्यापा-याकडून १२०० रुपये यूजर चार्जेस रक्कम घेतली. मागील तीन वर्षात मनपाने सुमारे ३२.९६ कोटी रुपये नागरिकांकडून यूजर चार्जस वसूल केला. त्यातील २१ कोटी खर्च केला. मात्र, ज्या कामासाठी रक्कम वसूल केली त्या कामासाठी वापरच केला नाही. ड्रेनेज कामासाठी नागरिकांकडून युजर चार्ज वसूल करण्यात आला होता. मात्र त्याचा वापर या योजनेसाठी झालेला दिसत नाही. इतर कामासाठी या निधीचा वापर झाला.