आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिधापत्रिकाधारकाची माहिती ऑनलाइन भरा, अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील दुकानदारांकडून बीपीएल, अंत्योदय एपीएल शिधापत्रिकाधारकांची माहिती जमा केली आहे, मात्र शासनाच्या आदेशानुसार पुन्हा एकदा रेशन दुकानदारांनी सर्वच शिधापत्रिकाधारकांकडून कुटुंबातील सदस्यांची नावे, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाइल क्रमांक सध्याचा पत्ता ही माहिती जमा करण्याच्या सूचना अन्नधान्य वितरण अधिकारी दिनेश भालेदार यांनी केल्या.

शासन आदेशानुसार राज्यभरातील स्वस्त दुकानांना बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अन्न नागरी पुरवठा मंत्री यांनी धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी दुकानांतून धान्य वितरण करण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली राबवण्याचे आदेश दिले, त्यानुसार या पद्धतीचे अंमलबजावणी करण्यासाठी युनिकोडमध्ये सर्व लाभार्थ्यांची माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे.

सध्या असलेल्या माहितीवर अवलंबून राहता आता पुन्हा नव्याने प्रत्येक लाभार्थ्यांची माहिती घ्यावी. यामध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाइल क्रमांक सध्याचा पत्ता ही माहिती महत्त्वाची असणार आहे. शिवाय मृत लाभार्थी, नवीन लाभार्थी विभक्त कुटुंबातील सदस्य याचाही समावेश करण्याच्या सूचना श्री. भालेदार यांनी केल्या.

शिधापत्रिकाधारकांना आवाहन...
पुढीलकाळात धान्य मिळण्यासाठी, शिवाय शासनाच्या विविध योजनांचे अनुदान मिळण्यासाठी आधार क्रमांक बँक खाते यांची लिंक असणे आवश्यक असणार आहे. सध्या गॅस अनुदान मिळण्यासाठी बंधनकारक करण्यात आले असून भविष्यकाळात इतर योजनांनाही लागू करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक शिधापत्रिकाधारकांनी जवळील स्वस्त धान्य दुकानदाराकडे संूपर्ण नावासह आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाइल क्रमांक जमा करण्याचे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी भालेदार यांनी केले आहे.