आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवयोगी सिद्धरामेश्वर चित्रपट प्रदर्शनास सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरचा निर्माता, दिग्दर्शक अभिनेता ईरण्णा कचेरी आणि सोलापूरच्याच तंत्रज्ञांनी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर हा चित्रपट तयार केला आहे. सॉलीवूडचा हा चित्रपट १६ जानेवारी रोजी गेंट्याल आणि आशा चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील कलावंत, कॅमेरा, गीतकार, संगीतकार, संकलक, वितरक आणि प्रकाशयोजना - लाइट विभाग असे सारे काही सोलापूरच्याच मातीतून तयार झाले आहे. त्यामुुळे यंदाच्या सिद्धेश्वर यात्रेत सोलापूरच्या रसिकांना बाल सिद्धरामेश्वर ते त्यांच्या योगसमाधीपर्यंतचा प्रवास या चित्रपटातून पाहवयास मिळणार आहे.

बालशिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या जन्माच्या कथेपासूनचा संपूर्ण भक्तीचा प्रवास यात आहे. तत्कालिन सामाजिक परिस्थिती, भक्ती संप्रदाय आणि योगसमाधी क्षणापर्यंतचा काळ चित्रपटात आहे. स्पेशल इफेक्ट््स या तंत्राचा वापर करण्यात आला आहे.

-हा चित्रपट तयार करण्यासाठी खूप प्रयत्न केले. सिद्धरामेश्वर यांच्या भक्तीमुळे धार्मिक चित्रपट तयार केला. यामध्ये सोलापूरच्या ७० कलावंतांचा समावेश आहे. सोलपूरच्या मातीत तयार झालेल्या चित्रपटाचे कौतुक करण्यासाठी सोलापूरकरांनी चित्रपट पाहावा. ईरण्णाकचेरी, निर्मातािदग्दर्शक

इथे झाले चित्रीकरण
सोलापुरातीलआचेगाव, वळसंग, हत्तरसंग, बोराळे यासह उस्मानबाद येथे या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. चित्रपटात सुमारे हजार वर्षांपूर्वीचा काळ चितारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी राहुल चवरे यांची मदत लाभली आहे.
हे आहेत चित्रपटाचे शिल्पकार
संकल्पना,कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन हे ईरण्णा कचेरी यांचे असून चित्रपटाची गीते युवा गीतकार मनोज टोणपे यांनी रचली आहेत. चित्रपटाचे छायांकन शाहीर हरकारे यांनी तर संकलन सचिन जगताप यांनी केले आहे. चित्रपटात सहा ते सात गीते असून पार्श्वसंगीत सुरेश संबाळ यांनी केले आहे. ईरण्णा कचेरी यांनी स्वत: सिद्धरामेश्वर यांची भूमिका साकारली आहे.