आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Film On Sushil Kumar Shinde Issue At Solapur, Divya Marathi

केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्या जीवनावर चित्रपट, सोलापुरात शुक्रवारपासून प्रदर्शित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-दलित समाजात जन्म. डोक्यावर पित्याचा हात नाही. दु:खांना कायम हसतमुखाने तोंड देणार्‍या मुलापासून दहशतवाद्यांना सुळावर लटकवणारे गृहमंत्री, असा प्रेरणादायी प्रवास साकारणार्‍या ‘दुसरी गोष्ट’ या चित्रपटाने प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. राजकीय प्रवास करू इच्छिणार्‍यांसाठी मार्गदर्शक आणि मूर्तिमंत उदाहरण यातून प्रभावीपणे पुढे आले आहे.
सोलापूरचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने शिंदे यांच्या जीवनाचा खडतर प्रवास आणि सुखाच्या घटनांचा प्रवास उलगडला आहे. कष्टमय बालपण, दोन्ही आईंचे प्रेम, पट्टेवाला, नाट्यकलाकार, फौजदार, मग वकील आणि शेवटी शरद पवार यांनी दिलेली राजकीय संधी, असा पट समोर येतो.
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी कथानकाची मांडणी उत्तम केली आहे. विक्रम गोखले, संदीप मेहता तर सिद्धार्थ जाधव यांनी शिंदेंच्या तडफदार भूमिका जिवंत केल्या आहेत. नेहा पेंडसे, प्रतीक्षा लोणकर (शिंदेंच्या पत्नी), स्मिता सरवदे (आई) या सर्वांच्या व्यक्तिरेखा निवडी अचूक झाल्या आहेत.
सोलापूरचे कलावंत
शशिकांत लावणीस, रजनीश जोशी, शिरीष देखणे, विजय कुलकर्णी, अमीर तडवळकर, अरविंद अंदोरे, प्रशांत बडवे, अमोल देशमुख, सारिका अग्निहोत्री, प्राची जेऊरकर.
प्रेक्षक म्हणतात..
सत्यावर आधारित असल्याने मन काही ठिकाणी हळवे होते. मनीषा गायकवाड, गृहिणी
सकारात्मक नेत्याची राजकीय वाटचाल याचे उत्तम उदाहरण. शिवकुमार मठ, नोकरी
नेता बनण्यासाठी खूप कष्ट करावे लागते, हे यातून क ळले. किरण मालवडे, नोकरी
कलावंत काहीही करू शकतो याचे हे एक उत्तम उदाहरण. नाटकाने व भाषेने बदल झाला. गणेश मरोड, व्यवसाय