आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवकलावंतांना सोलापूर के शोले चित्रपटात संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर फिल्म इन्स्टिट्यूटच्या वतीने निर्मित होणार्‍या सोलापूर के शोले चित्रपटासाठी शनिवारी शेवटची ऑडिशन घेण्यात आली. यामध्ये सोलापूरच्या नवकलावंतांना अभिनय, गायन, नृत्य याकरिता संधी मिळणार आहे. ऑडिशनला नवकलावंतांनी मोठय़ा उत्साहाने प्रतिसाद दिले.
ऑडिशन फॅशन डिझायनर कामिनी गांधी आणि एजाज शेख यांनी घेतल्या. या वेळी सादिक दारूवाला व सोलापूर फिल्म इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी अभिनय गटात अपूर्वा पकाले, सागर साळुंके, मल्लिका पाटील, अतुल नवगिरे, राहुल चौरे, अनंत शेटे, गायन गटात सुप्रिया सोरटे, गौतमी जितुरी, चैतन्य जमादार, आनंद भालेराव, अब्दुल शेख, मोहम्मद शकील, आकाश जाधव यांची निवड करण्यात आली तर नृत्यात प्रसाद विभुते, शार्वी सदाफुले, ललित स्वामी, अंबादास आडकी, सागर साळुंके यांची निवड करण्यात आली.
सोलापुरात कलेसाठी चांगले वातावरण आहे. युवा महोत्सवसारख्या उपक्रमांतून नवख्या कलाकारांना व्यासपीठ मिळते. सोलापूर के शोले चित्रपटामुळे चांगली संधी मिळाल्याचे नवकलाकारांनी सांगितले.
आधी प्रशिक्षण मग भूमिका

नवकलावंतांना संधी देण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे सोलापूरमध्ये ऑडिशन घेतली. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. ज्या कलावंतांची निवड करण्यात आली, त्यांना अभिनयाचे, नृत्याचे रितसर प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतरच त्यांना चित्रपटात भूमिका दिली जाणार आहे. एजाज शेख, दिग्दर्शक, सोलापूर के शोले
चांगली संधी मिळाली

चित्रपटात काम करण्यास मिळणे ही एक उत्तम संधी आहे. चित्रपटात काम कसे करतात याची माहिती होईल. मी यापूर्वी नाटकातून काम केले आहे. मात्र, चित्रपटात प्रथमच काम करणार आहे. अपूर्वा पकाले, कलावंत