आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Film World : Big Budget Badsha Releasing In Solapur

चित्रपट सृष्‍टी : सोलापुरात झळकला 55 कोटींचा बिग बजेट ‘बादशाह’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - तेलुगु सिनेसृष्टीने अलीकडच्या काळात जे काही चित्रपट दिले, त्यात 55 कोटींचा बिग बजेट असलेला बादशाह हा तेलुगु चित्रपट नुकताच सोलापुरातील श्रीनिवास टॉकीजमध्ये रिलीज झाला. ज्युनिअर एनटीआरची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचा विषय नेहमीचाच मारधाड अँक्शन असला तरी चित्रपटाचे बिग बजेट आणि रसिकांचे प्रेम हे एक वेगळे वैशिष्ट्य ठरावे.

कोणताही चित्रपट लागला तर रसिक पोस्टरला हार घालणे, फटाके उडवणे समजू शकतो. पण, आवडत्या हिरोसमवेत आपलेही फोटो झळकावणे हे एक अजब लोकप्रियतेचे रसायन म्हणावे लागेल. बंदला गणेश बाबू यांची निर्मिती आणि श्रीनू वईटला यांचे दिग्दश्रन आणि तेलुगुतील आघाडीचे सर्व अभिनेते, विदेशात चित्रण हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. ज्युनिअर एनटीआरसमवेत काजल अग्रवालची यात मुख्य भूमिका आहे. काजल अग्रवाल 2004 पासून काम करते. ‘क्यूं हो गया ना’ हा तिचा पहिला चित्रपट. अलीकडच्या ‘स्पेशल 26’ या हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. हिंदीपेक्षा ती दक्षिणेत व्यस्त आहे. या खेरीज नवदीप हिंदीतील मुकेश ऋषी, आशिष विद्यार्थी हे अभिनेते, तेलुगुतील अभिनेते नासर, कॉमेडियन ब्रहमानंदम्, एम. एस. नारायण, मराठी अभिनेता सयाजी शिंदे, साधूभाई या व्हिलनच्या भूमिकेत केली दोरजी आहेत. चित्रपटाचा सुरुवातीचा भाग हा इटली, स्वीत्झर्लंड, बँकॉक या ठिकाणी बादशाहचे चित्रीकरण झाले. भारतीय निर्माते ज्या सफाईदार पद्धतीने विदेशात चित्रण घेतात, मॉब सीनमध्ये विदेशी कलावंतांना वापरतात, ते पाहून भारतीय निर्माते एक दिवस हॉलीवूडमध्ये निश्चित मोठे यश मिळवितील, असा विश्वास वाटतो.
अमेरिकेतही प्रदश्रन

ज्युनिअर एनटीआरचा वेगळा लूक, हेअरस्टाइल आणि त्याची डायलॉगफेक खणखणीत आहे. जनरल पब्लिक एंटरटेनमेंट असे या चित्रपटाचे स्वरूप आहे. मराठी अभिनेता व नाट्यकलावंत सयाजी शिंदे याने दक्षिणेत चांगलाच जम बसविला आहे. अलीकडच्या जवळपास प्रत्येक तेलुगु चित्रपटात तो असतोच. हा चित्रपट अमेरिकेतील 76 चित्रपटगृहातही प्रदश्रित झालेला आहे.

संमिश्र प्रतिसाद
बादशाह याच आठवड्यात रिलीज झाला. आपल्याकडे हल्ली असं झालं आहे की, पूर्व भागातील बर्‍याच प्रेक्षकांनी आपली या परिसरातील मूळची घरे सोडून ते सोलापूरच्या लांब लांब भागात राहायला गेले. त्यामुळे संमिश्र प्रतिसाद आहे. आंध्रातही संमिश्र प्रतिसाद आहे.’’ श्री. चिप्पा, व्यवस्थापक, श्रीनिवास टॉकीज