आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वराह कंपनीला ३६ लाखांचा दंड; पण गुन्हा दाखल नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर ते संगारेड्डी या चार पदरी राष्ट्रीय महामार्गासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातून विनापरवाना मुरूम उपसा केल्याप्रकरणी वराह कंपनीला जिल्हा महसूल प्रशासनाने ३६ लाख रुपयांचा दंड ठोठावला. कोणतीही रॉयल्टी भरता विनापरवाना मुरूम उपसा केल्याने प्रशिक्षणार्थी तहसीलदार डी. गंगाथरन यांनी ही दंडात्मक कारवाई केली. विनापरवाना मुरूम उपसा हा गंभीर गुन्हा असतानाही कंपनीवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
वराह कंपनी बोरामणी, मुस्ती, तांदुळवाडी आदी परिसरात विनापरवाना मुरूम उपसा करत असल्याच्या तक्रारी अपर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडे आल्या होत्या. तक्रारीवरून तहसीलदार गंगाथरन यांनी चौकशी केली असता बोरामणी येथे गट क्रमांक ६१०, ६१३, ५५४ ५५७ येथून हजार ब्रास मुरूम उपसा करण्यात आल्याचे समोर आले.

नियमानुसार २४ ऐवजी ३६ लाख रुपये केला दंड...
प्रति ब्रास २०० रुपये याप्रमाणे हजार ब्रासची रॉयल्टी म्हणून लाख तीनपट दंड प्रति ब्रास ६०० रुपये याप्रमाणे १८ लाख असे एकूण २४ लाख रुपये दंडाची रक्कम घेणे अपेक्षित असताना कंपनीला ३६ लाख रुपये भरण्याचे आदेश तहसील कार्यालयांकडून देण्यात आले आहेत. कंपनीने अद्यापही दंडाची रक्कम मान्य केली नसून, यावर कंपनी म्हणणे मांडणार असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सोलापूर-पुणे महामार्गाचे काम करणाऱ्या आयएलएफएस कंपनीनेही मोठ्या प्रमाणात विनापरवाना मुरूम उपसा केल्याने उत्तर तहसीलदाराने १६ कोटी ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला. या दोन्ही प्रकरणामध्ये मुरूम चोरी प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना गुन्हा दाखल करण्यात आला नाही. हाच कित्ता येथेही गिरवला जातोय.

यापूर्वी गुन्हे दाखल केले आहेत...
वराह कंपनीने विनापरवाना मुरूम उपसा केल्याने त्यांना दंड केला आहे, माढा, करमाळा याठिकाणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. शिवाय मोठ्या प्रमाणावर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. वराह कंपनीवर तहसीलदारांनी कारवाई केली आहे, याबाबत माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. डॉ.प्रवीणकुमार देवरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी.