आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस शहर उपाध्यक्ष करगुळेंवर फौजदारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विनापरवाना डिजिटल फलक लावल्याने काँग्रेसचे उपाध्यक्ष अंबादास कुरगुळे यांच्या विरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात शनिवारी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. जुना एम्प्लॉयमेंट चौकातील डॉ. हेडगेवार रक्तपेढीसमोरील रस्ता दुभाजकावर फलक लावला होता. आमदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणारा दोन बाय आठ आकाराचा फलक करगुळे यांनी लावला होता.

फलक लावण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी झोन क्रमांक सातचे आवेक्षक नागनाथ इंगळे यांना चौकशीचे आदेश दिले. चौकशीत फलक विनापरवाना लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे करगुळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंधक अधिनियम 1995 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल झाला.