आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण कायद्याचा भंग; महेश कोठेंवर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सुशील संगीत महोत्सवात ध्वनिक्षेपक जास्त वेळ चालू ठेवला, पर्यावरण कायद्याचा भंग केल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा कार्यक्रम दयानंद काशिनाथ आसावा हायस्कूलच्या मैदानावर सहा व सात सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते दहा यावेळेत होता. साडेदहापर्यंत ध्वनिक्षेपक चालू ठेवून पर्यावरण कायद्याचा भंग केला व पोलिसांच्या अटीचा भंग केल्यामुळे कार्यक्रम आयोजक नगरसेवक महेश कोठे यांच्यावर जोडभावी पोलिसात सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोळी यांनी फिर्याद दिली आहे. मुंबई पोलिस कायदा कलम व पर्यावरण कायद्याचा भंग केला म्हणून कलम (15-1) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.