आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजी-माजी नगरसेविकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गोदूताई विडी घरकुल येथे ड्रेनेजसाठी खोदकाम केलेल्या खड्डय़ात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी विद्यमान आणि माजी नगरसेविकांसह पाच जणांवर वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खड्डय़ाच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

गोदूताई गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष, माकपच्या विद्यमान नगरसेविका सुनंदा सिद्राम बल्ला, सचिव, माजी नगरसेविका नसीमा घुडूभाई शेख यांच्यासह साइट सुपरवायझर दिलीप गावडे, साइट इंजिनीअर राजशेखर पट्टणशेट्टी, सुपरवायझर मल्लिनाथ चितकोटी या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून अल्तमश पटेल (वय 6) आणि राकेश मादगुंडी (वय 7) या दोन मुलांचा मंगळवारी मृत्यू झाला होता. बुधवारी हा प्रकार उघडकीस आला.