आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगीत तीन घरांचे नुकसान, गृहोपयोगी वस्तू जळून खाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर हजरतशाहजहूरवली कादरी दर्ग्याच्या बाजूला असलेल्या घरांना आग लागली. यात तीन घरातील गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाले. तीन घरातून सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नाही. शनिवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास एका घराला आग लागली. तिन्ही घरे जवळजवळ असल्याने आग बघता बघता पसरली. अडीच वाजण्याच्या सुमारास अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. अवघ्या आर्धा तासास दोन बंब वापरून आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत तानाजी विष्णू सोमवंशी यांचे दोन लाख, राजेंद्र संत्राम सोमवंशी यांचे दीड लाख, सिद्राम विष्णू सोमवंशी यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये कपडे आणि गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाले.
फोटो - सुफी शाहजहूर दर्गा परिसरातील घरास आग लागल्याने व्यथित झालेले कुटुंब.
बातम्या आणखी आहेत...