आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दमाणी रक्तपेढीस आग, पाच लाखांचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - डफरीन चौकातील गोपाबाई दमाणी रक्तपेढीला लागलेल्या आगीत कंपोनंट सेक्शनचे नुकसान झाले. कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे मोठे नुकसान टळले. अग्निशामक विभाग तातडीने धाऊन आला. केवळ अर्धाबंबच पाण्याचा फवारा करण्यात आला. ही घटना बुधवारी दुपारी 12 वाजता घडली. या घटनेची नोंद सदर बझार पोलिस ठाण्यात झाली.
रक्तपेढीचे व्यवस्थापक अशोक नावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी अंतर्गत वायरिंगमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. कंपोनंट सेक्शनमधील वातानुकूलित यंत्र, स्टॅबिलायझर, वायरिंगचे जळून नुकसान झाले. कर्मचार्‍यांनी तत्परता दाखवून आजूबाजूच्या खोल्यांमधील साहित्य तातडीने हलवले. आगीत किमान पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नावरे यांनी सांगितले. मनपा अग्निशामक विभागात या घटनेची नोंद झाली. सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले असल्याचे वाहन चालक सीताराम मदनावाले यांनी सांगितले.
४रक्तपेढीच्या काही भागाला आग लागली होती. त्याचा रक्तसाठा किंवा इतर गोष्टींवर परिणाम झालेला नाही.
अशोक नावरे, व्यवस्थापक
(फोटो - आगीमुळे महिला कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर काळजी पसरली.)