आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Volvo Bus Enter The City News In Marathi, Divya Marathi,

पहिली व्हॉल्वो बस शहरात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- केंद्राच्या जेएनयूआरएम योजनेअंतर्गत शहरात 200 सिटीबस येणार आहेत. त्यात व्हॉल्वो कंपनीच्या 20 वातानुकूलीत बस आहेत. त्यापैकी एक मॉडेल बस शुक्रवारी सकाळी बंगळूरूहून शहरात दाखल झाली. त्याचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी 4.30 वाजता राजेंद्र चौक बस डेपो येथे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

इतरही विशेष सुविधा
मोबाइल चार्जिंगसाठी व्यवस्था, स्पीकर, चालकाजवळ माईक, तिकीट काढण्याचे यंत्र, प्रत्येक दरवाजांना स्वतंत्र दोन बटण, त्यापैकी एक ऑटोमॅटिक तर एक साधा. काही कारणांमुळे आग लागली तर ऑटोमॅटिक आग शमन यंत्र मागील बाजूस बसवण्यात आले आहे. गिअर टाकायची गरज नाही. ऑटोमेटिक पडतील. जीपीआरएस सिस्टिमसह टेलोमॅक्ट्रिक यंत्र.

चालकावर नियंत्रण
बस चालवताना चालकाकडून हलगर्जीपणा झाल्यास टेलोमॅक्ट्रिक्स सिस्टिममुळे त्याची माहिती कर्मशाळा व्यवस्थापकास मिळेल. इंधन जास्त असेल तर त्याचीही माहिती कळेल.

अशी आहे बस
अत्याधुनिक पद्धतीचे आसन - 32
प्रवासी उभे राहण्याची क्षमता - 35
सीसीटीव्ही कॅमेरे - 3 (1 बाहेरच्या बाजूस)
तत्काळ बस थांबवण्याचे बटण - 2

तूर्त वापरात नाही
आलेली मॉडेल बस आहे. विविध भागांत फिरवून रस्त्याची आणि इतर बाबींची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे तूर्त तरी बस नागरिकांसाठी रस्त्यावर धावणार नाही.

आयुक्तांकडून पाहणी
बस शुक्रवारी सकाळी आल्यानंतर दुपारी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सात रस्ता येथील बस डेपोत जावून बसची पाहणी केली.