आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या नेमबाजांना पाच सुवर्ण , सुमीत यादव, ओंकार घाडके वैष्णवी गायकवाड चमकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शालेय राष्ट्रीय रायफल शुटींग स्पर्धेत सोलापूरच्या तीन नेमबाजांनी सुवर्ण एक रौप्यची कमाई केली. सुमीत यादव (ज्ञानप्रबोधिनी), ओंकार घोडके (शांती स्कूल) वैष्णवी गायकवाड (सेवासदन) हे पदक पटकाविलेले नेमबाज आहेत. हे सर्व नेमबाज क्रीडा भारती शिवस्मारक शुटींग रेंजचे आहेत. त्यांना अविनाश गोसावी संदीप तरटे यांचे मार्गदर्शन लाभले.
पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत सुहास यादवने ओपन साईट एअर रायफल प्रकारात १७ वर्षांखालील गटात ३३३ तर १९ वर्षांखालील गटात ओंकार घोडकेने ३२४ गुण मिळिवत सुवर्ण पटकािवले. दोघांनीही सांघिक गटात सुवर्णची कमाई करीत दुहेरी मुकूट संपादिला. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात वैष्णवी गायकवाडने ३१८ गुण मिळविले. तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. सांघिक गटात मात्र तिने सुवर्णची भर घातली.

त्यांना अविनाश गोसावी संदीप तरटे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे क्रीडा भारतीचे अध्यक्ष डॉ. विलास हरपाळे, शिवस्मारकचे अध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांनी अभिनंदन केले.

शालेय राष्ट्रीय रायफल शुटींग स्पर्धेतील पदकप्राप्त नेमबाज (डावीकडून) वैष्णवी गायकवाड, ओंकार घोडके, प्रशिक्षक अविनाश गोसावी संदीप तरटे, सुमीत यादव.
मुळे हॉलमध्ये आज सत्कार होणार
क्रीडाभारतीच्या उन्हाळी शिबिराच्या समारोप्रसंगी पदकप्राप्त नेमबाजांचा रविवारी (ता. १०) सकाळी साडे आठ वाजता ह. दे. प्रशालेच्या मुळे हॉलमध्ये सत्कार आयोजिला आहे. क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्रीडा भारतीचे सचिव राजेश कळमणकर यांनी केले आहे.