आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - जुनी पोलिस लाइन, उमानगरी परिसरातील पाच घरांमध्ये चोरी झाली. चार घरांत ऐवज हाती लागला नाही तर एका घरातून 24 हजार रुपयांचा ऐवज गेला आहे. मागील चार दिवसांपासून सोलापुरात पुन्हा घरफोड्यांचे सत्र सुरू झाले असून तब्बल 20 ठिकाणी चोरी झाली आहे.
बसवराज मडिवाळ (रा. जुनी पोलिस लाइन) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमाराला उघडकीला आली. मडिवाळ हे घरात परिवारासह झोपले होते. किचनचा दरवाजा उचकटून चोरटे घरात आले. बेडरूमला बाहेरहून कडी लावली. हॉलमधील कपाटातून 20 हजार रुपये, दोन ग्रॅमची कर्णफुले चोरून नेले. त्यांच्या शेजारील उमानगरीत राहणारे शाहीन शेख, राजवीर बगरे, श्री. कुलकर्णी, राहुल कदम यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. पण, काही ऐवज चोरीला गेला नाही. एकदमच पाच घरांत चोरीचा प्रयत्न झाल्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे.
वाडिया हॉस्पिटलमध्ये चोरी
वाडिया हॉस्पिटलमधील आर्थोपेडिक वॉर्डाच्या बंद खोलीतून 20 लोखंडी पलंग, तीन सागवानची दारे, आठ कडीकोयंडे चोरीस गेले आहेत. मागील वर्षभरापासून ते 14 सप्टेंबरपर्यंत ही चोरी झाली असावी. हॉस्पिटलचे सुरक्षा रक्षक सिद्गाम कल्याणी यांनी सदर बझार पोलिसात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. बंद खोलीतून हे साहित्य चोरीस गेले आहे. त्याची किंमत चाळीस हजार रुपये आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र थोरात तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.