आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवेढ्यात पकडले पाच कोटी, रक्कम डिसीसीच्या सांगोला मंगळवेढा शाखेची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा- निवडणुकीसाठीनेमलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाने बुधवारी रात्री साडेसहाच्या सुमारास येथील टोल नाक्यावर वाहनातून पाच कोटी रुपये घेऊन जाताना पकडले. चौकशीअंती ही रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सांगोला मंगळवेढा येथील शाखेची असल्याचे पुरव्यानिशी निष्पन्न झाले. ते त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. सोलापूरहून निघालेल्या क्रुझर गाडीची (एमएच 10 सी 9902) पथक प्रमुख विलास कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल अभिजित मोहोळकर, व्हिडीओग्राफर किरण भंडारे, शंकर वगरे यांनी तपासणी केली. त्यावेळी गाडीत पाच कोटी रुपये असल्याचे निदर्शनास आले. पथकाने ही रक्कम ताब्यात घेऊन तत्काळ तहसीलदार पुनाजी कोथेरे यांच्याशी संपर्क साधला. वाहनातील कर्मचाऱ्यांनी ही रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सांगोला मंगळवेढा येथील शाखेची असल्याचे सांिगतले. तहसीलदार कोथेरे यांनी सांगोला मंगळवेढा बँकेकडे खातरजमा केली. तसेच कर्मचाऱ्यांनी या बँकेची रक्कम असल्याचे लेखी पत्र दाखवले. तसेच पुराव्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ही रक्कम बँक कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली. पाच कोटींमधील तीन कोटी सांगोला आिण दोन कोटी मंगळवेढा शाखेचे असल्याचे सांगण्यात आले. बँक कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार पथकाने रकमेची पडताळणी केली.
चौकशीनंतर रक्कम परत
पाचकोटी रुपये घेऊन जाताना क्रुझर गाडी पथकाने पकडली. याबाबत तहसीलदार पुनाजी कोथेरे यांना माहिती देण्यात येऊन अधिक सखोल चौकशी केल्यानंतर ही रक्कम सांगोला मंगळवेढा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची असल्याचे पुराव्यानिशी सिध्द झाल्यानंतर ती रक्कम बँकेकडे देण्यात आली आहे.'' विलासकांबळे, स्थिरसर्वेक्षण पथक प्रमुख