आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रीय संगीतात रसिक झाले तल्लीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- श्यामराव बदामीकर यांच्या 23 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून पंडित आनंद बदामीकर यांनी रविवारी सायंकाळी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता. पहिल्या सत्रात शास्त्रीय गायक सुधांशू कुलकर्णी यांनी राग मारवा सादर करताना विलंबित एकतालमध्ये मदनाद हे बंदिश गायिले. त्यानंतर द्रुत एकतालमध्ये बोलन बिनकब सादर केले त्यानंतर सुरत पिया हे नाट्यगीत सादर केले. सुखाचे सुख या भजनास रसिकांनी चांगलीच दाद दिली. या वेळी संवादिनीवर नागनाथ नागेशी यांनी तर तबल्यावर ओंकार सूर्यवंशी यांनी साथ दिली, तानपुर्‍यावर उमा कुलकर्णी यांनी साथ दिली. दुसर्‍या सत्रात सारंग कुलकर्णी यांनी बहारदार सरोद वादन केले. या वेळी पंडित आनंद बदामीकर यांनी तबल्यावर साथ दिली. तर पखवाज वर ओंकार दळवी यांनी साथ दिली.