आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहतुकीला शिस्त लावा अन्यथा पोलिसांवर कारवाई - जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील वाहतूक शिस्त लागावी, मुख्य रस्त्यावरील रहदारीस अडथळे दूर करावेत, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडून महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त परिवहन अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. ज्यांना आदेश दिले तेच अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. यामुळे जिल्हाधिकारी यांनी शेवटचा पर्याय म्हणून ज्या भागामध्ये वाहतुकीमध्ये सुधारणा होत नाही, त्याठिकाणी संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आरटीओ िनरीक्षक यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतूक उपायुक्त, महापालिका उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत वाहतूक शाखेकडून शहरातील काही वर्षापूवी तयार केलेली तीच ती माहिती सादर केली. यामध्ये शहरातील अतिमहत्त्वाची वर्दळीची १८ ठिकाणे, महत्त्वाची १० ठिकाणे, दर्जाची ठिकाणे आणि जड वाहतूक वळविण्यासाठी ठिकाणे नेमल्याच्या माहितीचा समावेश आहे. जिल्हाधिकारी यांनी शहरामध्ये प्रवेश बंदी, एकेरी मार्ग, पार्किंग यासह वाहतुकीस शिस्त लागेल, अशा पद्धतीने माहिती फलक लावण्याचे आदेश दिले हाेते. मनपाकडून फक्त रिक्षा थांब्यांचे फलक लावल्याचे सांगण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी हे दिले आदेश
>अधिक रहदारीच्या ठिकाणी स्वतंत्र वाहतूक पोलिस नेमावेत, नवीन रिक्षा थांबे तयार करावेत,
>ट्रॅफिक जाम होणाऱ्या ठिकाणी नवीन एकेरी मार्ग निश्चित करावेत,
>शहरात येणाऱ्या सीटर रिक्षांवर कारवाई करावी,
>स्क्रॅप रिक्षांवर विशेष पथकाकडून कारवाई करा
>गरज तेथे माहितीदर्शक फलक लावावेत

शहरात नवीन आठ रिक्षा थांबे तयार
जिल्हाधिकारीमुंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरात नवीन रिक्षा थांबे तयार केले आहेत, त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवीन एकेरी मार्ग तयार करण्याविषयी बैठकीत काही ठरलेच नाही. शिवाय माहितीफलक लावण्याचे आदेश दिले नाहीत. अश्विनी सानप, उपायुक्त वाहतूक शहर.

७५स्क्रॅप रिक्षांवर केली कारवाई
जिल्हाधिकारीयांच्या आदेशानुसार गेल्या महिनाभरात शहरातील ७५ स्क्रॅप रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. बसस्थानक रेल्वेस्थानक परिसरात येत्या महिनाभरात प्रीपेड सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत अडीच हजार शाळांमध्ये परिवहन समितीची स्थापना केली. बजरंगखरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

फेरीवाल्यांवर थेट गुन्हे दाखल करा
शहरातीलवाहतुकीला शिस्त लागलीच पाहिजे. यासाठी जे फेरीवाले, हातगाडीवाले सूचना देऊनही हटणार नाहीत त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात वाहतुकीविषयीचे माहितीफलक लावण्यास सांगितले आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येईल. वाहतूक शिस्त महत्त्वाची आहे. तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी

यंत्रणा दाखवतेय एकमेकांकडे बोट...
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन वाहतूक सुधारण्यासाठी मनपा, पोलिस परिवहन विभागाच्या अधिकारी यांना सूचना केल्या. परंतु पहिल्या दिवशी कारवाई होते पुन्हा परिस्थिती जैसे थे राहते. वाहतूक यंत्रणा सुधारण्याची ज्यांची जबाबदारी आहे, तेच जबाबदारी झटकत असल्याचे दिसते. दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.
बातम्या आणखी आहेत...