आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भेसळ करणार्‍या तेलविक्रेत्यांवर संघटनाच करणार कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - खाद्यतेल विक्री करताना ग्राहकांची फसवणूक करू नका, असे आवाहन खाद्यतेल विक्रेता संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ ऊर्फ चन्नप्पा कारीमुंगी यांनी शनिवारी केले. खाद्यतेलातील भेसळबाबत ‘दिव्य मराठी’ने शनिवारच्या अंकात प्रकाश टाकला. त्याबाबत श्री. कारीमुंगी यांनी शहरातल्या किरकोळ विक्रेत्यांना याबाबतच्या सूचना केल्या.

खाद्यतेल थेट नागरी आरोग्याशी निगडित आहे. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक त्याची विक्री झाली पाहिजे. जादा पैसे मिळवण्याच्या नादात दुसर्‍यांच्या आरोग्याशी खेळण्याचा विक्रेत्यांना अधिकार नाही. अन्नविषयक कायदे, नियमांशी अधीन राहूनच हा व्यवसाय झाला तरच त्यातील विश्वासार्हता टिकून राहील, असे श्री. कारीमुंगी म्हणाले.

संघटनेच्या सूचना
दुकानात तेलनिहाय दर असलेच पाहिजे
‘गोडेतेल’ असा फलक लावणे चुकीचे
तेलाच्या पॅकिंगवर त्याचा उल्लेख हवा
मागतील त्या ग्राहकाला बिल पावती द्या

ग्राहकांनी विचारावे
खाद्यतेल दरात विविध दुकानांमध्ये तफावत आढळून येत असेल तर ग्राहकांनी त्याबाबत विक्रेत्याकडे विचारणा करावी. योग्य उत्तर मिळत नसेल तर त्यांनी संघटनेकडेही लेखी तक्रार द्यावी. त्याची जरूर दखल घेतली जाईल. काशिनाथ कारीमुंगी, अध्यक्ष, खाद्यतेल विक्रेता संघटना