आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषबाधित प्रकरण, मुली परतल्या घरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कोर्टी (ता.करमाळा) येथील छत्रपती शिवाजी प्रशालेत शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याने उपचारासाठी शनिवारी सिव्हिलमध्ये दाखल झालेल्या दोघी विद्यार्थिनी सुखरूप घरी परतल्या आहेत.
शामला शिंदे (वय १४), स्नेहा दामोदर (वय १५) यांना आहारातून विषबाधा झाल्याने आयसीयूमध्ये दाखल केले होते. दरम्यान याप्रकरणी शाळा मुख्याध्यापकांसह तिघांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. मंगळवारी त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक बाळासाहेब धडके यांनी दिली.