आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंद्रूपच्या कुंभार कुटुंबीयास अन्नातून विषबाधा; माजी सरपंचाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर- अन्नातून विषबाधा झाल्याने मंद्रूपच्या माजी सरपंचाचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील अन्य सहा जणांवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांच्या वडिलांची प्रकृती दुपारपर्यंत गंभीर होती. सायंकाळच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.

मल्लप्पा गुरण्णा कुंभार (वय 41) असे मृत्यू झालेल्या माजी सरपंचाचे, तर गुरण्णा मळेप्पा कुंभार (वय 80) असे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. आई काशीबाई, मुलगी अश्विनी, वैष्णवी व मुलगा कार्तिक, पुतण्या प्रमोद बसवराज कुंभार यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.