आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाख घरांना रेशनधान्य नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - वाहतूक बिलापोटीचे नऊ लाख रुपये थकल्याने ठेकेदार एस. बी. कोनापुरे यांनी एक ऑगस्टपासून शासकीय धान्य वाहतूक न केल्यामुळे ऐन ईद सणाच्या तोंडावर सुमारे दीड लाख शिधापत्रिकाधारक रेशनच्या धान्यापासून वंचित राहिले आहेत. कोनापुरे यास जिल्हाधिकार्‍यांनी दीड कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून तो अद्याप वसूल झालेला नाही. तरीही ठेकेदाराने प्रशासन आणि जनतेला वेठीस धरल्याने गोरगरीब कुटुंबांना रेशनचे धान्य मिळालेले नाही.

ऑगस्ट महिन्यासाठी शहरातील केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी नियमित व अतिरिक्त मिळून 19 हजार 284 क्विंटल गहू आणि चार हजार 948 क्विंटल तांदूळ कोटा मंजूर केला. दारिद्य्ररेषेखालील, बंदमिल, विडी कामगार व अंत्योदय आणि अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांसाठी सात हजार 150 क्विंटल गहू आणि पाच हजार 377 क्विंटल तांदळाचा कोटा मंजूर आहे. हा कोटा 31 जुलै 2012 रोजी मंजूर असून 16 ऑगस्टपर्यंत वाहतूक ठेकेदार कोनापुरे यांनी 9 लाख 36 हजार 720 रुपयांचे थकीत बिल मिळाले नसल्याकारणाने एफसीआय गोदामातून रामवाडी येथील शासकीय गोदामात धान्यच पोचवले नाही. शिल्लक धान्यातून बीपीएल शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप झाले. पण, दीड लाख केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रेशनच्या धान्यापासून वंचित राहावे लागले आहे.