आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेटसाठी विक्रेत्यांकडे वाढतेय वाहनचालकांची गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात येत्या जुलैपासून दुचाकीस्वारांना हेल्मेट वापर सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे हेल्मेट खरेदीसाठी वाहनचालकांची गर्दी होत आहे. चारचाकी वाहनांसाठी सीट बेल्ट सक्ती आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या दोन्ही बाबी चांगल्या आहेत. पण, नागरिकांनी मानसिकता बदलून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सोलापुरात ९८ टक्के नागरिक वाहतूक नियम पाळत नाहीत, असे चित्र अनेक दिवसांपासून दिसते. तरीही महिनाभरापासून वाहतूक पोलिस सिग्नल चालू ठेवत आहेत. फॅन्सी नंबर प्लेटवर, वाहतूक नियम पाळण्याची सक्ती करीत आहेत, हा बदल स्वीकारावा. वाहतूक नियम पाळण्याची जबाबदारी आता आपली आहे.

अन्यथा चित्र वेगळे राहिले असते
अक्कलकोटतालुक्यातील एका गावातील तरुणाचा सहा महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. दुचाकी खड्ड्यात पडल्यानंतर डोक्यावरच आपटल्यामुळे गंभीर जखमी होऊन तो मरण पावला. जर हेल्मेट असते तर चित्र वेगळे राहिले असते. असे अनेक अपघात घडतात. सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना पाहिजेत, असे मत नातेवाईकांनी नाव छापण्याच्या अटीवर सांगितले. आमच्या घरातील सदस्य गेला. तुम्ही सुरक्षित राहा आणि हेल्मेट वापरा.

हेल्मेट नसेल तर मेंदूला इजा
दुचाकीचा अपघात झाला तर डोक्याला मोठी इजा होते. कारचा अपघात झाल्यास किंवा अचानक ब्रेक लावावा लागल्यास मानेला झटका बसू शकतो. मज्जारज्जूला आतून जखम होते. मानेचे, मणक्याचे आजार उद्भवतात. फिजिओथेरपी, औषध खर्च जास्त होतो. हेल्मेटमुळे आणि सीटबेल्टमुळे अपघात जरी झाला तरी मार जोराने लागत नाही. तीव्रता कमी होते. अलीकडे कारमध्ये हवेचा फुगा असतो. अपघात अगोदर तो अॉटोमॅटिक फुगल्याने फायदा होतो.” डॉ.संदीप भागवत, फिजिओथेरपिस्ट

जागृती करणार
बुधवारपासून हेल्मेट सीटबेल्ट सक्ती आहे. त्याच्या दोन दिवस अगोदर पोलिस वाहनावरील माईकवरून सूचना देण्यात येतील. नागरिकांशी संवाद साधून जनजागृती करणार आहे. नागरिकांनी वाहतूक नियम पाळावेत.” सुनील घार्गे, वाहतूक पोलिस निरीक्षक
बातम्या आणखी आहेत...